गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:43 PM2020-08-30T16:43:49+5:302020-08-30T17:35:03+5:30

भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत.

Revenge of Galwan Valley! India launches warship in South China Sea | गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत

गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत

Next

नवी दिल्ली : जूनच्या मध्यावर लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चीनने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. गोळी चालविण्यास बंदी म्हणून लोखंडी तारांच्या रॉडनी पाठीमागून वार करण्यात आला होता. यातून सावरत भारतीय जवानांनीही जोरदार पाण्याच्या प्रवाहात चिनी सैनिकांवर मात केली. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे त्याहून अधिक मारले गेले. आता भारताने चीनच्या या कृत्याविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. 


भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्या जोडीनेच भारतानेही आघाडीची युद्धनौका पाठविली आहे. 


या भागात भारतीय नौदलाच्या अस्तित्वावर चीनकडून नेहमीच आक्षेप घेण्यात येत होता. 2009 पासून चीन या भागात कृत्रिम बेटे बनविणे आणि सैन्य तैनात करत होते. ''गलवान व्हॅलीमध्ये चीनच्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. यानंतर लगेचच भारतीय नौदलाने चीन दावा सांगत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका पाठविली आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी या भागात दुसऱ्या देशांच्या सैन्याला विरोध करते. या भागातील पाण्यावर चीन आपला हक्क सांगत आले आहे.'', असे सरकारी सुत्रांनी एएनआयला सांगितले. 

भारताच्या या तातडीने उचललेल्या पावलांचा फायदा चीनसोबतच्या तणाव निवळण्यावर आणि चीनच्या आक्रमकतेवर झाला आहे. यामुळे चीन चर्चा करतेवेळी नरमला आहे. याच काळात अमेरिकेच्या युद्धनौका येऊन पोहोचल्याने अमेरिकन नौदलासोबतही भारतीय युद्धनौका संपर्क ठेवून आहे.


मलाक्का सामुद्रधुनी आणि अंदमानच्या मार्गावरही अन्य युद्धनौका लक्ष ठेवून आहेत. या भारतीय भागात चीनचे नौदल प्रवेश करू शकते. तसेच चीनच्या युद्धनौका, पाणबुड्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. या भागातून अनेकदा चीनच्या युद्धनौकांनी हालचाली केल्या आहेत. या युद्धनौकांना इंधनाची गरज भासली तर त्या या भागाकडून पुढे जातात. 


यानंतर लगेचच पाणबुड्या तैनात करण्याची तयारी भारतीय नौदलाने केली आहे. तसेच मानवरहीत पाणबुड्याही तैनात केल्या जाणार आहेत. शिवाय सेन्सरही लावले जाणार आहेत. यामुळे पाण्याखालील शत्रूच्या हाचलाची लगेचच भारतीय नौदलाला समजणार आहेत. 
 

खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते

 

 

Web Title: Revenge of Galwan Valley! India launches warship in South China Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.