पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय सैन्याने घेतला बदला; पाकच्या दोन सैनिकांना मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:14 PM2018-08-14T12:14:11+5:302018-08-14T12:21:42+5:30
मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
श्रीनगर : काश्मीरमधील तंगधार क्षेत्रामध्ये मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकचे दोन सैनिक ठार झाले. सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मिळावी यासाठी जोरदार गोळीबार केला जात होता. यामध्ये अनेक जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय जवानांनी मंगळवारी रात्री दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. याचा बदला जवानांनी घेतला आहे.
Indian Army gunned down two Pakistani soldiers last night in a retaliatory action to unprovoked ceasefire violations and repeated attempts to facilitate infiltration by Pakistan Army in Tangdhar Sector: Defence PRO #JammuAndKashmir
— ANI (@ANI) August 14, 2018
सोमवारी नियंत्रण रेषेजवळ दोन वेगवेगळ्या स्फोटांमध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या कौस्तुभ राणेंसह तीन जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.