महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करा
By admin | Published: August 1, 2015 12:01 AM2015-08-01T00:01:13+5:302015-08-01T00:01:13+5:30
जिल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफार
Next
ज ल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफारसोलापूर: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी महाराजस्व अभियान अधिक परिणामकारक राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले़ मार्च २०१६ अखेर ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देणे, गाव दप्तर अद्ययावत करणे, अतिक्रमणे काढणे आदींबाबत जिल्हाधिकार्यांनी माहिती दिली़जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजस्व अभियान राबविण्याबाबत बैठक आयोजित केली हेाती़ त्यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, २९ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार महाराजस्व अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ या अभियानातील सर्व बाबींची पूर्तता करावी, ई-जिल्हाबाबत सर्व स्तरावर अंमलबजावणी करावी, लोकांपर्यंत प्रशासन पोहोचेल या दृष्टीने सर्वांनी कार्यवाही करण्याचे आवाहन केले़ या अभियानांतर्गत विविध दाखले शिबिरे घेऊन द्यावयाची आहेत़ आधार कार्ड काढून देण्याच्या तसेच विस्तारित समाधान योजनेंतर्गत सर्व सेवा दिल्या पाहिजेत़ ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारची प्रमाणपत्रे शिबिरे घेऊन दिली जावीत, अशा सूचना यावेळी दिल्या़या अभियानांतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढणे, निष्कासन मोहीम परिणामकारक कालबध्द कार्यक्रम राबवून ६ महिन्यांत कार्यवाही पूर्ण करणे, विविध प्रकारच्या जमिनींची डेटाबँक तयार करणे, शासकीय जमिनीवरील भाडेप्यांचे नूतनीकरण आदींबाबत विशेष मोहिमा राबविण्याबाबत चर्चा झाली़