महसूल अधिकार्याचा रेल्वेखाली मृत्यू
By admin | Published: August 25, 2016 01:33 AM2016-08-25T01:33:20+5:302016-08-25T01:33:20+5:30
जळगाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Next
ज गाव : शहरातील रेल्वे स्थानकावर न थांबणार्या पटना एक्सप्रेसमध्ये (अप) बसलेल्या महेश वेरूळकर (वय ४५) रा.जळगाव या महसुली अधिकार्याचा जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.२ वर घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील इंद्रप्रस्थनगरमधील महेश मधुकर वेरूळकर हे भुसावळ येथील तहसील कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ते रोज जळगाव ते भुसावळ रेल्वेने अपडाऊन करतात. सायंकाळी काम आटोपल्यानंतर ते भुसावळ येथून जळगावकडे रेल्वेने यायला निघाले. अशातच ते पटना एक्सप्रेसमध्ये बसले. ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबत नाही. ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनवर फलाट क्र. २ आली असता वेरूळकर यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचा वेग अधिक होता. वेग अधिक असल्याने वेरूळकर हे खाली कोसळले व रेल्वेखाली आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब फलाटावरील प्रवाशांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. लागलीच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन तास पत्ता शोधलावेरूळकर यांच्याकडे असलेल्या बॅगेत त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड होते. त्यावरून त्यांची ओळख पटली. दोन तासानंतर त्यांच्या कुटुंबियांना शोधण्यात येऊन त्यांना ही माहिती दिली.