१२९१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत सुधारित पैसेवारी : यावल, रावेर व भुसावळ तालुक्यातील ३३ नवीन गावांचा समावेश
By admin | Published: October 31, 2015 10:43 PM2015-10-31T22:43:44+5:302015-10-31T22:43:44+5:30
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या गावांची संख्या १२९१ पर्यंत पोहचली आहे.
Next
ज गाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या गावांची संख्या १२९१ पर्यंत पोहचली आहे.यावल व रावेर तालुक्यांचा समावेशजिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर रोजी हंगामी (नजर) पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात जिल्ातील जळगाव, धरणगाव, जामनेर, एरंडोल, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर व पारोळा या तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैश्याच्या आत लावण्यात आली होती. रावेर, यावल तालुक्यातील सर्व तर चोपडा तालुक्यातील ३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त होती. सुधारित पैसेवारी दरम्यान रावेर तालुक्यातील १९ गावांचा, यावल तालुक्यातील १० गावांचा तर भुसावळ तालुक्यातील ४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला.२१० गावांची पैसेवारी ५० पैशांवरहंगामी पैसेवारीच्या वेळी महसूल प्रशासनाने १५ सप्टेंबर रोजी १२५८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत घोषित केली होती. त्यात आता ३३ नव्या गावांची भर पडली आहे. तर यावल तालुक्यातील ७४, रावेर तालुक्यातील १०२, मुक्ताईनगर तालुक्यातील ४ व चोपडा तालुक्यातील ३० अशा एकुण २१० गावांची पैसेवारी ही ५० पैशांचे वर आहे.