साडेतीन वर्षांत दीड लाख अपघातग्रस्तांना नवसंजीवनी; १०८ रुग्णवाहिका वरदान; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:18 AM2022-04-18T06:18:41+5:302022-04-18T06:20:24+5:30

अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.

Revival of 1.5 lakh accident victims in three and a half years; 108 ambulance and Treatment in ‘Golden Hour’ | साडेतीन वर्षांत दीड लाख अपघातग्रस्तांना नवसंजीवनी; १०८ रुग्णवाहिका वरदान; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार

साडेतीन वर्षांत दीड लाख अपघातग्रस्तांना नवसंजीवनी; १०८ रुग्णवाहिका वरदान; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार

googlenewsNext

 
स्नेहा मोरे -

मुंबई : अपघात हे सांगून होत नसतात, परंतु ते टाळणे अथवा इजा होऊ नये व कमीतकमी दुखापत व्हावी, यासाठी मात्र आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्वरित काय उपचार करावेत हेही महत्त्वाचे आहे. राज्यात मागील तीन वर्षांत २०१९ ते २०२२ या काळात १ लाख ५३ हजार ३०० अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिकेने नवसंजीवनी दिली. 

अपघातातील गंभीर जखमींवर ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार केले जातात. अपघातानंतर १५ ते २० मिनिटांत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचते. गंभीर जखमी व उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या ७२ तासांत ठराविक रकमेपर्यंत उपचारांची तरतूद आहे.  

हे लक्षात ठेवा!
- जखमींचा श्वासोच्छ् वास व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे का, हे बघा. 
- रुग्णवाहिकेला बोलवा, हॉस्पिटलशी संपर्क करा. त्याचा रक्तस्राव थांबवा. 
- हृदयाचे ठोके लागत नसतील तर त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या व त्याची छाती हाताने दाबून पंप करा. 
- फ्रॅक्चर असल्यास त्या भागाला आधार देऊन त्याची हालचाल थांबवा. 

कालावधी    किती अपघातग्रस्तांना मदत
२०१९                    ५९०१२ 
२०२०                   ३६९८६ 
२०२१                   ४७३०२
२०२२                   १०३०५ 

अपघात टाळण्यासाठी व झाल्यानंतर काय करावे, याचे प्रबोधन होण्याचीही गरज आहे. अपघात झाल्यापासून एक तासात उपचार मिळाल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता असते. या कालावधीला  ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचवून उपचार सुरू होणे फार गरजेचे असते. वेळीच उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते.
- डॉ. किशोरी बडे, हाडविकार तज्ज्ञ
 

Web Title: Revival of 1.5 lakh accident victims in three and a half years; 108 ambulance and Treatment in ‘Golden Hour’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.