‘ओपनएआय’मध्ये ७०० कर्मचाऱ्यांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:54 AM2023-11-22T07:54:10+5:302023-11-22T07:54:46+5:30

ऑल्टमन, ब्रोकमन यांना परत आणण्याची मागणी

Revolt of 700 employees in 'OpenAI' | ‘ओपनएआय’मध्ये ७०० कर्मचाऱ्यांचे बंड

‘ओपनएआय’मध्ये ७०० कर्मचाऱ्यांचे बंड

नवी दिल्ली : ओपनएआयमधील उलथापालथीनंतर कंपनीच्या ७७० पैकी ७०० कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाविरुद्ध बंड पुकारले असून सॅम ऑल्टमन व ग्रॅग ब्रोकमन यांना परत आणण्याच्या मागणीसह अनेक मागण्या कंपनीसमोर ठेवल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मायक्रोसॉफ्टने नव्याने घोषित केलेल्या ‘ॲडव्हॉन्स एआय लॅब’मध्ये जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. नवीन संचालक मंडळ बनवून दोन स्वतंत्र संचालकांकडे कंपनीचे नेतृत्व देण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मीरा मुरातींचीही सही 
nकर्मचाऱ्यांनी कंपनीला सादर केलेल्या निवेदनावर मीरा मुराती यांचीही स्वाक्षरी आहे. 
nयाशिवाय संचालक व मुख्य डाटा शास्त्रज्ञ इलिया सुतस्केवर आणि सीओओ ब्रॅड लाईट कॅप यांनीही निवेदनावर स्वाक्षरी केलेली आहे. 

 

 

Web Title: Revolt of 700 employees in 'OpenAI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.