Kolkata Doctor Case : "ते मोठ्या ध्येयासाठी लढताहेत"; ममता बॅनर्जींच्या विधानावर डॉक्टरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 09:42 AM2024-09-12T09:42:08+5:302024-09-12T09:50:40+5:30

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी आरजी कर हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या कुटुंबाला पैशांची ऑफर दिल्याचा आरोप फेटाळला आहे.

rg kar medical college doctor deceased father accused cm mamata banerjee for falsehood | Kolkata Doctor Case : "ते मोठ्या ध्येयासाठी लढताहेत"; ममता बॅनर्जींच्या विधानावर डॉक्टरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

Kolkata Doctor Case : "ते मोठ्या ध्येयासाठी लढताहेत"; ममता बॅनर्जींच्या विधानावर डॉक्टरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरजी कर हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या कुटुंबाला पैशांची ऑफर दिल्याचा आरोप फेटाळला आहे. या वादावर ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खरं बोलत आहेत की नाही हे ठरवणं ते सर्वसामान्य लोकांवर सोडत आहेत. तसेच आंदोलक डॉक्टर एका मोठ्या ध्येयासाठी लढत आहेत. वडिलांनी असा दावा केला की, जेव्हा ममता या घटनेनंतर त्यांच्या घरी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी भरपाईची ऑफर दिली होती.

"आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या दिवशी आमच्या घरी आल्या, तेव्हा त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई देण्याची ऑफर केली. नंतर एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे घोषणा केली की, आमचं सरकार आमच्या मुलीच्या स्मरणार्थ काहीतरी उभारण्यासाठी आम्हाला १० लाख रुपये देऊ शकते. आता त्या (मुख्यमंत्री) खरं बोलत आहेत की नाही... हे मी जनतेवर सोडतो." यापूर्वी मुलीच्या आईनेही नुकसान भरपाई देण्याबाबत सांगितलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना पैशांची ऑफर दिल्याचा आरोप फेटाळून लावला. राज्य सरकारने कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांचा एक गट होता असं सांगितलं. तसेच ट्रेनी डॉक्टरच्या कुटुंबीयांना मी कधीही पैसे देऊ केले नाहीत. हे बदनामीसाठी केलं जात आहे. मी डॉक्टरच्या पालकांना सांगितलं की, त्यांना त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ काही करायचे असेल तर आमचं सरकार त्यांच्या सोबत आहे. कधी काय बोलायचं हे मला माहीत आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या ज्युनियर डॉक्टरांच्या संपाचं तुमचं समर्थन करता का? असा प्रश्न विचारल्यावर ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे. "रुग्णांच्या वेदना आणि होणारा त्रास आम्ही समजू शकतो, परंतु तुम्हालाही हे समजून घ्यावं लागेल की डॉक्टर मोठ्या ध्येयासाठी लढत आहेत. डॉक्टरांचं काम रुग्णांवर उपचार करणं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं आहे, परंतु आता ते रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही त्यांचं मनापासून समर्थन करतो" असं वडिलांनी सांगितलं. 
 

Web Title: rg kar medical college doctor deceased father accused cm mamata banerjee for falsehood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.