सध्या प्रत्येक पक्षातच एकाधिकारशाही - आडवाणी

By admin | Published: June 20, 2015 10:39 AM2015-06-20T10:39:46+5:302015-06-20T10:41:50+5:30

अहंकारातूनच हुकूमशाही वृत्तीचा जन्म होतो, दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होत असल्याची खंत लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.

Right now, every party has a monopoly - Advani | सध्या प्रत्येक पक्षातच एकाधिकारशाही - आडवाणी

सध्या प्रत्येक पक्षातच एकाधिकारशाही - आडवाणी

Next

ऑनलाइन लोकमत ट

नवी दिल्ली, दि. २०-  अहंकारातूनच हुकूमशाही वृत्तीचा जन्म होतो, दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होत असून विद्यमान नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे विनम्र असले पाहिजे असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मांडले आहे.  

देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते असे विधान करत लालकृ्ष्ण आडवाणी यांनी भाजपाच्या गटात खळबळ उडवून दिली होती. आता आडवाणी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा भाजपा व अन्य पक्षातील सद्यस्थितीवर रोखठोख मतं मांडली आहेत. मी नेहमीच एकाधिकारशाहीच्या विरोधात असून दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरु आहे असे त्यांनी म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी हे महान नेते आहेत, मात्र वाजपेयी म्हणजे भारत व भारत म्हणजे वाजपेयी असे त्यांनी कधी म्हटले नव्हते. विद्यमान नेत्यांनी वाजपेयी यांच्यासारखे विनम्र असले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये आडवाणी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Right now, every party has a monopoly - Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.