कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

By admin | Published: April 6, 2017 04:27 AM2017-04-06T04:27:53+5:302017-04-06T04:27:53+5:30

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे

The right step for debt waiver: Rahul Gandhi | कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

Next

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे, अशी टीकाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशपुरता न राहता, देशभरातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी करण्यात यावी, त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नये, अशी मागणी केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी योग्य दिशेने उचललेले हे पाऊल आहे. शेतकऱ्याचे कर्ज करण्यात यावे, अशी काँग्रेसची भूमिका आणि मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने हा निर्णय घेतला, याचा आनंद आहे. मात्र याचे राजकारण केले जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये, असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The right step for debt waiver: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.