शनि दर्शनाबाबत घटनेने दिलेल्या हक्कांचे पालन व्हावे
By admin | Published: February 7, 2016 10:46 PM2016-02-07T22:46:09+5:302016-02-07T22:46:09+5:30
जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
Next
ज गाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. डॉ.दाभोळकर शहरात समता शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्न- शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीच्या मुद्द्यावर काय मत आहे?डॉ.दाभोळकर- शनि चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी २००० या वर्षर्ी अंनिसने आंदोलन केले होते. घटनेने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांचे पालन या मुद्द्यावरही व्हायला हवे. आम्ही या मुद्द्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तामिळनाडूमधील शबरी मला मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा याबाबतही आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रीतपणे कामकाज व्हावे. प्रश्न- डॉ.नरंेद्र दाभोळकर यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. याविषयी काय वाटते?डॉ.दाभोळकर- डॉ.दाभोळकरांसह गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकसारख्या पिस्तुलाचा वापर झाल्याचा अहवाल समोर आला आहे. पण शासन तपासाबाबत उदासीन आहे. आघाडी सरकारच्या काळात डॉ.दाभोळकर यांची हत्या झाली. त्या काळातही सरकार आणि विरोधक याविषयी गंभीर नव्हते. प्रश्न- जायपंचायतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. ही समस्या कशी दूर करता येईल?डॉ.दाभोळकर- जात पंचायती नष्ट करण्यासाठी कायदा करायला हवा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जात पंचायतींच्या प्रमुखांनीही त्या नष्ट करण्यासाठी पुढे यावे. अशा पुढाकाराने राज्यात आठ जात पंचायतींना मूठमाती दिली गेली. ग्रामीण भागात जाऊन प्रबोधन कार्यक्रमही हाती घेण्याची आवश्यकता आहे. प्रश्न- अंनिसची चळवळ पुढे नेण्यासाठी कुठला कार्यक्रम आहे का?डॉ.दाभोळकर- अंनिसची चळवळ राज्यात रूजली, वाढली व पुढे जात आहे. डॉ.दाभोळकर यांच्या हत्येनंतर ही चळवळ थांबेल, असे काहींना वाटत होते. पण आमचा एकही कार्यक्रम रद्द झालेला नाही. पुढे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आम्ही काम करणार आहोत. जाती, पातींच्या भिंती दूर कशा होतील यासाठी प्रबोधन केले जाईल. देवाच्या नावावर होणारी लुटमार, पिळवणूक, शोषण याला आमचा नेहमीच विरोध राहील.