एच-१बी व्हिसाचे कडक नियमन
By admin | Published: January 13, 2017 04:12 AM2017-01-13T04:12:30+5:302017-01-13T04:12:30+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, एच-१बी
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, एच-१बी आणि एल१ व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर उपायांसह विविध प्रकारची पावले उचलली जातील, असे प्रतिपादन सिनेटर जेफ सेशन यांनी केले आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका अर्थात, भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि त्या क्षेत्रातील भारतीय यांनाच बसणार आहे.
ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारातही आपली ही भूमिका बोलून दाखवली होती. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी केलेले विधान म्हणून त्याकडे पाहिले गेले. आता अॅटर्नी जनरल होणाऱ्या व्यक्तीने तीच भूमिका मांडल्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जेफ सेशन यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल या पदासाठी नियुक्त करण्याचे ठरविले आहे. सिनेटच्या न्यायालयीन समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान जेफ सेशन्स यांनी सांगितले की, ‘आपण सर्व जगासाठी खुले आहोत, असा विचार करणे चूक आहे.’ (वृत्तसंस्था)