शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणारी 'रिहाना' ट्विटरवर मोदींपेक्षा 'एक पाऊल पुढे'

By महेश गलांडे | Published: February 3, 2021 08:59 AM2021-02-03T08:59:06+5:302021-02-03T09:00:25+5:30

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे.

Rihanna tweets in support of farmers 'one step ahead' of narendra Modi on Twitter | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणारी 'रिहाना' ट्विटरवर मोदींपेक्षा 'एक पाऊल पुढे'

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणारी 'रिहाना' ट्विटरवर मोदींपेक्षा 'एक पाऊल पुढे'

Next
ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 63.5 मिलियन्स म्हणजेच 6 कोटी 35 लाख फॉलोवर्स आहेत. तर, रिहानाचे तब्बल 1001 मिलियन्स म्हणजेच 11 कोटी फॉलोवर्स आहेत. त्यामुळे, ट्विटरवर रिहाना मोदींपेक्षा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय असल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेता यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. आता, हॉलिवूडची गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय. 

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, रिहानाच्या ट्विटनंतर आता तिच्या फॉलोवर्सचीच चर्चा रंगली आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरील फॉलोवर्सच्या तुलनेत रिहाना एक पाऊल पुढेच आहे. 

नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 63.5 मिलियन्स म्हणजेच 6 कोटी 35 लाख फॉलोवर्स आहेत. तर, रिहानाचे तब्बल 1001 मिलियन्स म्हणजेच 11 कोटी फॉलोवर्स आहेत. त्यामुळे, ट्विटरवर रिहाना मोदींपेक्षा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय असल्याचे दिसून येते. रिहाना 1029 जणांना फॉलो करत असून पंतप्रधान मोदी 2351 जणांना फॉलो करत आहेत. रिहाना बारबडीयन गायिका असून अभिनेत्री व उद्योजकही आहे. रिहाना ही 32 वर्षांची असून 21 व्या शतकातील जगातील टॉप गायिका आहे.     

ग्रेटा थनबर्गनेही केले समर्थन -
रिहानानंतर आता स्विड‍िश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

सीमेवर तणावपूर्ण स्थिती -
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले होते. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करत आहे. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळेदेखील ठोकण्यात येत आहे. 
 

Web Title: Rihanna tweets in support of farmers 'one step ahead' of narendra Modi on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.