गुजरातमध्ये पतंग उडविण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी
By admin | Published: January 15, 2015 01:22 AM2015-01-15T01:22:41+5:302015-01-15T01:22:41+5:30
अहमदाबाद : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील हानसोत येथे पतंग उडविण्यावरून दोन गटांमध्ये उडालेल्या हिंसक संघर्षात तीन जण ठार आणि दहा जखमी झाले.
Next
अ मदाबाद : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील हानसोत येथे पतंग उडविण्यावरून दोन गटांमध्ये उडालेल्या हिंसक संघर्षात तीन जण ठार आणि दहा जखमी झाले.आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही अतिरिक्त सुरक्षा दल बोलावले आहे. पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे भरुचचे पोलीस अधीक्षक बिपिन अहिरे यांनी सांगितले. या दंगलीत एक जण जागीच मारला गेला तर दोघांचा सुरत येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहा जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.मकरसंक्रांतीच्या दिवशी अम्बेता गावात पतंग उडविण्यावरून दोन गटांत झालेल्या भांडणानंतर ही दंगल उसळली. या संघर्षानंतर लोक समोरासमोर आले आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. अम्बेता आणि हानसोत येथे लोकांनी दुकाने व वाहनांवर दगडफेक करून जाळपोळही केली. एका मुलाला पतंग पकडल्यावरून मारहाण केल्यानंतर ही दंगल उसळल्याचे समजते. संतप्त जमावाने काही धार्मिक स्थळांनाही लक्ष्य बनवून दगडफेक केली. या लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला आणि नंतर अश्रूधुराचा वापर करावा लागला. (वृत्तसंस्था)