बापरे! चीनकडून गेल्या 5 दिवसांत 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:29 PM2020-06-24T13:29:34+5:302020-06-24T13:39:06+5:30

चीनने सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा आणि जनतेचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Rise In Cyber Attacks From China, Over 40,000 Cases In 5 Days | बापरे! चीनकडून गेल्या 5 दिवसांत 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले; 'असा' करा बचाव

बापरे! चीनकडून गेल्या 5 दिवसांत 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले; 'असा' करा बचाव

Next

संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे. मात्र, असे असतानाही त्याची मग्रुरी कमी झालेली नाही. सिमाभागात घुसखोरी करणारा चीन आता संगणकाद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा आणि जनतेचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबद्दलची अॅडव्हायझरी महाराष्ट्र सायबर विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

चिनी हॅकर्सकडून देशातील सायबर क्षेत्रावर आक्रमण करण्यात आले असून प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर, माहिती आणि बँकिंग क्षेत्राला लक्ष्य केले आहे. गेल्या ४-५ दिवससांत त्यांच्याकडून ४० हजार ३०० सायबर हल्ले करण्यात आले आहेत. त्याला प्रतिबंधासाठी प्रत्येकाने जागरूक राहून आपल्या अकाऊंटसची सुरक्षा व दक्षता बाळगावी, त्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घ्यावी.

सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चीनने याबाबत सुरुवात देखील केली आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका इमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

कशा पद्धतीने सायबर अटॅक होऊ शकतो- 

1. तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला मेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit. त्या मेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. 

2. covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा बनावट सरकारी मेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. त्याला प्रतिसाद न देण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. 

सायबर अटॅकपासून अशा प्रकारे करा बचाव-

1. स्वतः चे इंटरनेट आणि कम्प्युटर वापरावे ते वापरत असताना योग्य अॅन्टीव्हायरस आणि अपडेट करावा. वापर करण्याआधी स्कॅन करून मगच वापरावे.

2. अनोळखी ठिकाणी/ व्यक्तींना इंटरनेट आणि कम्प्युटर/मोबाईल वापरू देऊ नका. तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

3. आपला फोन अपरिचित वाटणारी गोष्ट करत असेल जसे वारंवार गरम आहेत असेल, रिस्टार्ट होत असेल तर सायबर एक्सपर्टकडे जाऊन सल्ला घ्यावा.

Web Title: Rise In Cyber Attacks From China, Over 40,000 Cases In 5 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.