दिल्लीत हॉटस्पॉट वाढणे चिंताजनक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:41 AM2020-04-29T04:41:00+5:302020-04-29T04:41:12+5:30

एम्ससह अन्य केंद्र सरकारच्या संस्था व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजधानीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

The rise of hotspots in Delhi is worrisome, the Union Health Minister said | दिल्लीत हॉटस्पॉट वाढणे चिंताजनक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

दिल्लीत हॉटस्पॉट वाढणे चिंताजनक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

Next

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संसगार्बाबत केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच, एम्ससह अन्य केंद्र सरकारच्या संस्था व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजधानीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
दिल्लीतील कोरोना स्थितीबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी आढावा घेतला. नायब राज्यपाल अनिल बेजल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जेन, दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. दिल्लीतील कोरोना संसगार्चा दर हा ४.११ टक्के आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत तो अधिक आहे. दिल्लीत आतार्पयत ३३ डॉक्टर, २६ नर्स आणि २४ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. दिल्लीत सध्या ९८ हॉटस्पॉट आहेत. संपूर्ण राजधानी रेड झोन होणो चिंतेचा विषय आहे. दाट लोकसंख्या असलेल्या भागात लॉकडाऊनचे कसोशीने पालन केले जात नाही.


त्यामुळे स्थिती नियंत्रणात येत नसल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. मरकज येथे घडलेली घटना प्रमुख कारण आहे. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात येणो आवश्यक होते. आरोग्य मंत्रलयाने वरिष्ठ अधिका:यांना दिल्लीवर विशेष लक्ष देण्याचे तसेच एम्स सह अन्य संस्थांनी त्यात योगदान द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी आपण योगदान द्यावे, अशी विनंती बेजल यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी केली. दिल्लीत कोरोनाचा मृत्यू दर हा अन्य राज्यांच्या तुलनेत कमी म्हणजे 1.7 एवढा आहे. मात्र, रुग्णांची संख्या 3108 झाली आहे. यातील 1084 बाधित हे तबलिगी जमात घटनेशी संबंधित आहेत. पश्चिम दिल्ली वगळता सर्व जिल्हे रेड झोन तसेच आॅरेंज झोन मध्ये आहेत. मध्य दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे बेठकीत सांगण्यात आले.

Web Title: The rise of hotspots in Delhi is worrisome, the Union Health Minister said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.