Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा लक्झरी कारमध्ये अपघात; किती सुरक्षित होती पंतची Mercedes ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:58 PM2022-12-30T13:58:52+5:302022-12-30T14:01:33+5:30

Rishabh Pant Accident: आज सकाळी भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा दिल्ली-देहरादून हायवेवर भीषण अपघात झाला आहे.

Rishabh Pant Accident: Rishabh Pant's accident in a luxury car; How safe was Pant's Mercedes? Find out | Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा लक्झरी कारमध्ये अपघात; किती सुरक्षित होती पंतची Mercedes ? जाणून घ्या...

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा लक्झरी कारमध्ये अपघात; किती सुरक्षित होती पंतची Mercedes ? जाणून घ्या...

googlenewsNext

Rishabh Pant News: भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. हरिद्वारमध्ये दिल्ली-देहरादून हायवेवर ऋषभची Mercedes कार भरधाव वेगाने डिवायडरवर धडकली. या अपघातात पंतला गंभीर इजा झाली आहे, पण तो सध्या धोक्याबाहेर आहे. उत्तराखंड सरकारने उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. आता प्रश्न हा पडतो की, Mercedes सारखी लक्झरी कार किती सुरक्षित असते. 

Mercedes GLE: सेफ्टी फीचर्स


लक्झरी कार्स खूप महाग असतात, याचे कारण म्हणजे, त्यात असलेले विविध फीचर्स. या कार्स उच्च स्तराच्या सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्ससह येतात. टीओआयच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंत Mercedes GLE चालवत होता. पंतच्या मर्सिडीज जीएलएमध्ये मल्टीबीम LED, अडॅप्टिव्ह हायबीम असिस्ट प्लस, 360 डिग्री कॅमेरा पार्किंग पॅकेज, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, अॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट, इमरजेंसी स्पेअर व्हील, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसारखे फीचर्स आहेत. इतके हायटेक फीचर्स असूनही ऋषभ अपघातात गंभीर जखमी झाला.

नेमका अपघात कसा घडला 

नवी दिल्लीहून रिषभ पंत हा उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी वाटेत सव्वा पाचच्या सुमारास त्याची कार वेगाने नारसन बॉर्डरवरील रेलिंगवर आदळली. यानंतर कारलाही आगली, यावेळी कारचे दरवाजे जाम झाल्याने रिषभ आतच अडकला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पाठीलाही जखमा झाल्या आहेत. 

उपस्थितांनी रुग्णालयात नेले
यानंतर उपस्थित लोकांनी कारच्या खिडकीची काच फोडून बाहेर काढल्यानंतर रिषभला लोकांनी तातडीने रुडकीच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रिषभच्या शरीराला जास्त जखमा नाहीत, परंतू त्याचा एक पाय फ्रॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, आता त्याला दिल्लीला नेण्यात येणार आहे.

सायरस मिस्त्री यांचाही असाच अपघात
काही महिन्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्रीयांचाही कार अपघातात मृत्यू झाला. ते आपल्या मित्रांसोबत मर्सिडीज बेंज GLC 220 D 4MATIC कारमधून जात होते. पालघर जिल्ह्यात हा अपघात झाला. सायरस यांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे अपघात झाला होता. त्यांच्या मर्सिडीज कारमध्येही अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी-थेफ्ट अलार्मसारखे सेफ्टी फीचर्स होते.

Web Title: Rishabh Pant Accident: Rishabh Pant's accident in a luxury car; How safe was Pant's Mercedes? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.