कोविशिल्ड घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटचा धोका, आयसीएमआरच्या अभ्यासात निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:28 AM2021-07-05T09:28:13+5:302021-07-05T09:28:42+5:30

या अभ्यासातून हे सूचित होते की, भारतात काही लोकांना कोविशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोविड-१९ ची बाधा झाली होती त्यांना पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन यांनी सांगितले.

Risk of delta variant even for those who take Covishield says ICMR study | कोविशिल्ड घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटचा धोका, आयसीएमआरच्या अभ्यासात निष्कर्ष

कोविशिल्ड घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटचा धोका, आयसीएमआरच्या अभ्यासात निष्कर्ष

googlenewsNext

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांच्या नमुन्यांच्या केलेल्या अभ्यासात १६.१ टक्के नमुन्यांत कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटला (बी १.६१७.२) तोंड देणाऱ्या अँटिबॉडीज सापडल्या नाहीत, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. याशिवाय कोविशिल्ड लसीची एकच मात्रा घेतलेल्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासात ५८.१ टक्क्यांमध्ये ॲटिबॉडीज सापडल्या नाहीत. (Risk of delta variant even for those who take Covishield says ICMR study) 

हा अभ्यास इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्चने केला असून या अभ्यासाची अजून समीक्षा झालेली नाही. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. टी. जॅकोब जॉन म्हणाले की, “दिसले नाही याचा अर्थ ते नाहीत, असे नाही. अँटिबॉडीजची पातळी इतकी कमी असू शकेल की ती शोधलीच गेली नाही. परंतु, ती तेथे असू शकेल आणि व्यक्तिचे विषाणूपासून आणि गंभीर आजारापासून संरक्षण करू शकेल. याशिवाय काही पेशी या प्रतिकार शक्तीसाठी मध्यस्थ म्हणून काम करतील म्हणजे व्यक्तिच्या संरक्षणाचे काम होईल.” सीरमने अभ्यासासाठी सदृढ व्यक्तिंचा उपयोग केला, असे गृहित धरू. वृद्ध, सहव्याधी असलेले किंवा जुनाट आजार असल्यामुळे ज्यांची प्रतिकार पातळी कमी आहे अशा व्यक्तिंच्या तुलनेत अँटिबॉडीजचे निरीक्षण न केलेल्या व्यक्तिंमधील प्रतिकार शक्तिची पातळी जास्त असेल.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय,फुफ्फुस, मूत्रपिंडाची जुनाट दुखणी असलेल्या किंवा कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ६५ वर्षांच्या पुढील पुरूषांना (महिला या अँटिबॉडीजची पातळी जास्त निर्माण करतात) लसीची तिसरी मात्रा दिली गेली पाहिजे,” असे डॉ. जॉन म्हणाले.

अतिरिक्त मात्रा?
या अभ्यासातून हे सूचित होते की, भारतात काही लोकांना कोविशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोविड-१९ ची बाधा झाली होती त्यांना पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन यांनी सांगितले.
 

Web Title: Risk of delta variant even for those who take Covishield says ICMR study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.