इसिसचा धोका संपूर्ण जगाला
By Admin | Published: February 17, 2016 12:24 AM2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30
पोलीस महासंचालक : तरुणांमध्ये प्रभावी जनजागृतीची गरज
प लीस महासंचालक : तरुणांमध्ये प्रभावी जनजागृतीची गरज औरंगाबाद : जगातला कुठलाही देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त नाही. यात भारताचा क्रमांक कितवा, याला मी महत्त्व देत नाही; परंतु या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी आपला तरुण आपल्या ताब्यात कसा राहील, हे पाहिले पाहिजे. तो देशात राहण्यातच आपली प्रगती आहे, हे वाटायला लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित रविवारपासून औरंगाबाद दौर्यावर होते. त्यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयाचा आणि मंगळवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राचा आढावा घेतला. शहर पोलीस व मराठवाड्यातील दोन्ही परिक्षेत्रांतील वरिष्ठ अधिकार्यांशी थेट संवाद साधून त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.इसिसबाबत विचारलेल्या प्रश्नावर महासंचालकांनी सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना बोलण्यास सांगितले. आयुक्तांनी शहरातील तरुणांमध्ये जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत २७० शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांना राज्याबाबत विचारले असता पोलिसांनी भिवंडी, मालेगाव, उस्मानाबाद, कोकण आणि औरंगाबाद इ. ठिकाणांसह राज्यात तरुणांची मने वळविण्यासाठी जनजागृती सुरू केल्याचे सांगितले. (चौकट)इनकॅमेरा जबाब घेणारगंभीर गुन्ह्यात तक्रारदार पोलिसांत तक्रार करतो. प्रकरण न्यायालयात गेल्यावर स्वत: तक्रारदार मॅनेज झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही त्याच्या हस्ताक्षरात घ्यायची आणि त्याचा जबाब घेताना व्हिडिओ शूटिंग करायची, असे नियोजन सुरू आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले. (चौकट)१०० नक्षलवादी पकडलेनक्षलवादाबाबत बोलताना महासंचालक दीक्षित म्हणाले की, गडचिरोलीची सध्याची परिस्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. पोलीस, विशेष कृती दल यांचे वर्षभरातील काम अतिशय चांगले आहे. ५० नक्षली ठार झाले आहेत. शंभरहून जास्त नक्षली पकडण्यात आले आहेत. (जोड आहे)