रायसोनी अभियांत्रिकीत पारितोषिक वितरण उत्साहात
By admin | Published: April 5, 2016 12:14 AM2016-04-05T00:14:48+5:302016-04-05T00:14:48+5:30
जळगाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ.आर.डी.कुलकर्णी यांनी जी.एच. रायसोनी अभियांत्रिक महाविद्यालयात 'अंतराग्नी' वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जवळपास १२० पारितोषिके वितरित करण्यात आले.
Next
ज गाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ.आर.डी.कुलकर्णी यांनी जी.एच. रायसोनी अभियांत्रिक महाविद्यालयात 'अंतराग्नी' वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जवळपास १२० पारितोषिके वितरित करण्यात आले.प्रसंगी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, समन्वयक प्रा.मनोज बागडे, उपप्राचार्य प्रा.हरीश भंगाळे व सर्व शाखेतील विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष- अनुजसिंग, सचिव नीलेश अत्तरदे, स्पोटस् अध्यक्ष चेतनकुमार चौधरी, सचिव सुधन्वा गुढे उपस्थित होते.स्पोर्ट मीटमधील क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, चेस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल व व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय, राज्य व अंतर विद्यापीठ स्तरीय पारितोषिके मिळविणार्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नीलेश अत्तरदे व आभार समन्वयक प्रा.मनोज बागडे यांनी मानले. पारितोषिक वितरण समन्वयक म्हणून प्रा.प्रशांत भोळे व गणेश धनोकार यांनी काम पाहिले.