काँग्रेसला धक्का देत रिटा बहुगुणांचा भाजपा प्रवेश
By admin | Published: October 20, 2016 04:12 PM2016-10-20T16:12:57+5:302016-10-20T17:17:09+5:30
उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा भजपामध्ये प्रवेश केला आहे. रिटा बहुगुणा या उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत. साल २००७-१२ च्या दरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या अध्यक्ष राहिल्या आहेत.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बहुगुणा म्हणाल्या, भाजपामध्ये प्रवेश करणाचा निर्णय मी विचारपुर्वक घेतला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सगळ्या जगाने मान्य केलं आहे, पण काँग्रेसने त्यावर मागितलेले पुरावे आणि विचारलेले प्रश्न मला आवडले नाहीत.
यापुर्वी बहुगुणा भाजपामध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चा होत्या. मे महिन्यात मुख्यमंत्री अखिलेश यादवयांना भेटल्यानंतर त्या समाजवादी पार्टीमध्येही जाणार असल्याच्या वृत्ताला उत आला होता. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश करत सर्व चर्चेंना पुर्णविराम दिला.