विधी २१-- मिरजमधील जुनी जलवाहिनी बदलणार

By admin | Published: December 19, 2014 11:19 PM2014-12-19T23:19:47+5:302014-12-19T23:19:47+5:30

Ritual 21- The old water tank of Miraj will change | विधी २१-- मिरजमधील जुनी जलवाहिनी बदलणार

विधी २१-- मिरजमधील जुनी जलवाहिनी बदलणार

Next
>(सांगली मिरज व कुपवाड यासाठी महत्वाचे )

विधी २१- मिरजमधील जुनी जलवाहिनी बदलणार
- गॅस्ट्रो नियंत्रणात : नगरविकास राज्यमंत्र्यांचा दावा
नागपूर : सांगली मिरज व कूपवाड या महापालिकेच्या हद्दीत गॅस्ट्रोची लागण झाली होती. त्यानंतर उपाय योजण्यात आले. आता गेल्या दहा दिवसात रुग्ण आढळून आलेले नाहीत, असा दावा करीत मिरजमधील ६० वर्षे जुनी जलवाहिनी बदलली जाईल, असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील विधानसभेत दिले.
नोव्हेंबर २०१४ मध्ये मिरज शहर गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडले होते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथे रुग्णांची संख्या वाढत आहे याकडे अनिल बाबर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधले. गॅस्ट्रोमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी यावर उपाय योजण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले, नोव्हेंबरमध्ये जुलाब व उलट्याचे रुग्ण आढळले होते. याची दखल घेत पाण्यात क्लोरिनच्या मात्रेत वाढ करण्यात आली. जलवाहिनीतील गळत्या दुरुस्त करण्यात आला. जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली. नळ जोडण्यांचे घरोघरी सर्वेक्षण करून सुस्थितीत नसलेल्या ३१० नळजोडण्या बंद करण्यात आल्याचे सांगितले. यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सांगली मिरज महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात गॅस्ट्रोची लागण झाल्याचा आरोप करीत संबंधित महापालिकेवर गुन्हा दाखल करून बरखास्त करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर पाटील यांनी महापालिकेने या प्रकरणी विशेष काळजी घेतली असल्याचा दावा केला. ही काँग्रेसची महापालिका असल्यामुळे आपण ती बरखास्त करण्याचा आग्रह धरणे योग्य नाही, असा चिमटा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जयंत पाटील यांना काढला.

Web Title: Ritual 21- The old water tank of Miraj will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.