दहशतवाद्यांना रॅम्बो, पोस्टर बॉय होऊ देणार नाही - बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:55 PM2020-05-07T20:55:28+5:302020-05-07T21:06:21+5:30

पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता.

riyaz naikoo hizbu mujahideen commander cds general bipin rawat SSS | दहशतवाद्यांना रॅम्बो, पोस्टर बॉय होऊ देणार नाही - बिपीन रावत

दहशतवाद्यांना रॅम्बो, पोस्टर बॉय होऊ देणार नाही - बिपीन रावत

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला आहे. नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. लष्कराने त्याच्यावर 12 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो कुख्यात दहशतवादी बुऱ्हान वानी याच्या कोअर ग्रुपचा सदस्य होता. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी सैन्याचं कौतुक केलं आहे.

बिपीन रावत यांनी सुरक्षा दलाच्या धाडसी अधिकाऱ्यांचं आणि जवानांचं कौतुक केलं आहे. दहशतवादाचं नेतृत्व करणाऱ्यांना आधी संपवण्याची प्राथमिकता सुरक्षा दलाने आखली आहे. या रॅम्बो इमेज असणाऱ्या पोस्टर बॉयला पाहून आणखी कोणीही तरुण रस्ता भटकणार नाही. दहशतवादाच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त होऊ शकतील असं रावत यांनी म्हटलं आहे. तसेच 'हे लोक स्वत:ची इमेज अशी बनवतात जसं काही ते जनतेसाठी लढत आहेत. प्रत्यक्षात मात्र ते स्वत:चा आणि दहशतवादाचा प्रसार करत असतात. आपल्याला लोकांचा पाठिंबा मिळण्यासाठी आपली अशी प्रतिमा तयार करतात. पण आम्ही हे होऊ देणार नाही' असंही त्यांनी म्हटलं आहे. 

'गेल्या काही दिवसांत आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा सेनेकडून एखाद्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर केला जातो तेव्हा हे लोक त्याची अशी इमेज तयार करतात जसं त्यांनी लोकांसाठी बलिदान दिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी दहशतवादी बुरहान वानी पोस्टर बॉय बनला होता. त्यामुळे जेव्हा त्याचा एन्काऊंटर करण्यात आला तेव्हा काश्मीरमधली परिस्थिती बिघडली. लोक रस्त्यावर उतरलेले दिसले त्यांनी दगडफेकही केली. त्यामुळेच, सेनेनं दहशतवादी नायकूचा कोणताही फोटो जाहीर केला नाही. यांची प्रेरणा घेत आणखी तरुण दहशतवादाच्या मार्गावर जाऊ नयेत. दहशतवादाचं नेतृत्वच निशाण्यावर घेणं ही सेनेची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये होणारी तरुणांची भर्ती कमी होईल. दहशतवादी जनतेचे हिरो होता कामा नयेत' असं बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. 

काश्मीर खोऱ्यातला हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाझ नायकूचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं. हंदवाड्यात एक कर्नल, एक मेजर, दोन जवान आणि एक पोलीस कर्मचारी गमावल्यानंतर सैन्यानं हिज्बुलच्या म्होरक्याला कंठस्नान घालून बदला घेतला. भारतीय सुरक्षा दलांनी नायकूचा समावेश ए प्लस प्लस यादीत केला होता. त्यावरुन नायकूचं दहशतवाद्यांमध्ये असलेलं स्थान समजून घेता येईल. नायकूच्या नावावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वसामान्यपणे दहशतवादाच्या मार्गानं गेलेले तरुण गरीब कुटुंबातले असतात. नायकू यालाही अपवाद होता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी गरीब नाही.

2010-11 मध्ये नायकू पुलवामात गणित शिकवायचा. शाळेत, महाविद्यालयात तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नायकू एका खासगी शाळेत गणित शिकवू लागला. गावातल्या अनेक गरीब कुटुंबातल्या मुलांना तो मोफत शिकवायचा. 2010 मध्ये काश्मीरमध्ये एका बोगस चकमकीविरोधात वातावरण तापलं. या चकमकीत 100 पेक्षा अधिक जण मारले गेले होते. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातलं वातावरण स्फोटक झालं. यानंतर नायकूनं आंदोलनांमध्ये भाग घेतला. त्यावेळी त्याला अटक झाली. 2012 मध्ये नायकूची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर तो दहशतवादाच्या मार्गाकडे वळला. त्यानं 6 जून 2012 रोजी हिज्बुलमध्ये प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! ...तर देशात भासू शकते मिठाची कमतरता

विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती

Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

 

Web Title: riyaz naikoo hizbu mujahideen commander cds general bipin rawat SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.