पोलिसांच्या हत्येमागे रियाज नायकूचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:00 PM2018-09-21T15:00:43+5:302018-09-21T15:09:35+5:30
काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे.
श्रीनगर - काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येमागे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कुख्यात कमांडर रियाज नायकू याचा हात असल्याचे समोर येत आहे.
रियाज नायकू याने १२ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्याने व्हिडिओमधून दहशतवाद्यांच्या नातेवाईकांची तीन दिवसांत मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
Shopian: Wreath laying ceremony of police personnel Nisar Ahmad, Firdous Kuchay & Kulwant Singh who were kidnapped by terrorists in south Kashmir's Shopian and were later found dead today. #JammuAndKashmirpic.twitter.com/dMj8j20ftw
— ANI (@ANI) September 21, 2018
फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली होती. तर उर्वरित तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केली. तसेच काही दिवसांपूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनने पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरी सोडा अन्यथा परिणामांस तयार राहा, अशी धमकी दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या अपहरणाच्या घटना सातत्याने घडत आहेत.