"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:29 PM2023-09-30T17:29:57+5:302023-09-30T17:31:16+5:30

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरजेडी नेता अब्दुल बारी सिद्दीकी यांचे विधान

RJD Abdul Bari Siddiqui controversial words women reservation lipstick ladies will snatch your rights | "आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद

"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद

googlenewsNext

Abdul Bari Siddiqui, Women Reservation: लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचे फायर ब्रँड नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. महिला आरक्षण कायद्यावर सिद्दीकी म्हणाले की, आता लिपस्टिक आणि बॉबकट केस असलेल्या महिला येतील आणि तुम्हा महिलांचे हक्क हिरावून घेतील. लोकसभा आणि विधानसभेत मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय महिलांना कोटा देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्याबद्दल बोलतानाच त्यांनी लिपस्टिक संबंधीचे विधान केल्याने त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

अब्दुल बारी सिद्दीकी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते महिलांबद्दल वक्तव्य करताना दिसत आहेत. मुझफ्फरपूरमध्ये अतिमागासवर्गीय समाज परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना संबोधित करताना सिद्दीकी म्हणाले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली आता लिपस्टिक आणि बॉब कट वाल्या महिला संसदेत येतील आणि त्यामुळे सामान्य महिलांचे हक्क हिरावले जातील. मागासवर्गीय आणि अतिमागास प्रवर्गातील महिलांसाठीही केंद्र सरकारने कोटा निश्चित करावा, असे ते म्हणाले. अन्यथा लिपस्टिक लावणाऱ्या महिला इतरांचे हक्क हिरावून घेतील. अशा परिस्थितीत तुमच्या महिलांना काहीही मिळणार नाही, असे विधान त्यांनी केले.

महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी निश्चितच मिळाली आहे, परंतु या मुद्द्यावर अजून आक्षेपार्ह विधाने सुरूच आहेत. आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी महिला आरक्षणाबाबत अजब विधान केल्याने आता नवा वाद निर्माण होताना दिसत आहे. महिला आरक्षणात मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या महिलांना आरक्षण देण्याचे त्यांनी समर्थन केले, पण त्यासाठी त्यांनी केलेले विधान हे वाद निर्माण करणारे ठरले. तसेच, या कार्यक्रमात अब्दुल बारी सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याची शपथ दिली. टीव्ही आणि सोशल मीडियाच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात अडकलात तर तुमची प्रतिष्ठा आणि शिक्षण यात भर पडणार नाही, असे सिद्दीकी म्हणाले.

Web Title: RJD Abdul Bari Siddiqui controversial words women reservation lipstick ladies will snatch your rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.