"आई-वडील CM होते, मलाही डिग्री घेता आली असती...", नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:05 IST2023-12-17T18:04:45+5:302023-12-17T18:05:36+5:30
आता तेजस्वी यादव यांनी नववी फेलवरून विरोधकांना फटकारले असून, खोटी पदवी घेतली नसल्याचे म्हटले आहे.

"आई-वडील CM होते, मलाही डिग्री घेता आली असती...", नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तर
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांच्या कमी शिक्षणामुळे नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर असतात. मात्र, आता तेजस्वी यांनी नववी फेलवरून विरोधकांना फटकारले असून, खोटी पदवी घेतली नसल्याचे म्हटले आहे. तेजस्वी यादव यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सल्ला देताना म्हटले, "मुलांनी नक्कीच पदवी मिळवावी. पण, बाजारात अनेकजण बनावट डिग्री घेऊन फिरत आहेत." तेजस्वी यादव एका खासगी शाळेच्या शालेय क्रीडा संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बनावट डिग्री घेणाऱ्यांवर ताशेरे ओढले.
नववी फेल टीकेला तेजस्वी यांचे प्रत्युत्तर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पदवी खूप महत्त्वाची असते, सर्वांनी पदवी मिळवायला हवी. माझे आई-वडील दोघेही मुख्यमंत्री राहिले आहेत. मला हवे असते तर पदवी मिळवता आली असती, पण मी पदवी घेतली नाही. आज बनावट पदव्या घेऊन फिरणारे अनेक जण आहेत. मी असं म्हणणार नाही की, 'पढ़ोगे-लिखोगे तो होगे नवाब और खेलोगे कूदोगे तो होगे खराब'.
तसेच आता काळ बदलला आहे. जुनी म्हण चालणार नाही. आज खेळाचे युग आहे. खेळाचे महत्त्व आणखी वाढले आहे. बाहेर जा, खेळा, पण अंमली पदार्थांपासून दूर राहा. खेळाडूचे काम केवळ खेळणे आहे. नक्कीच खेळा, पण पदवी देखील मिळवा आणि यशाकडे वाटचाल करा, असेही तेजस्वी यादव यांनी नमूद केले.