राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादू-टोणा पार्टी’
By admin | Published: October 25, 2015 11:46 PM2015-10-25T23:46:35+5:302015-10-26T10:10:37+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले
छप्रा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले. बिहारचा विकास न होण्यासाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हेच जबाबदार असल्याचा आरोपही मोदींनी केला.
बिहारच्या छप्रा येथे आयोजित भाजपच्या निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी सहासूत्री कार्यक्रम सादर केला. युवा आणि दुर्बल घटकांच्या लोकांचा विकास करण्याची ग्वाही त्यात दिली आहे. विकासाच्या मुद्यावर भर देताना मोदी यांनी वीज, पाणी, रस्ते आणि राज्याच्या प्रत्येक कुटुंबाला उत्पन्न, शिक्षण आणि औषध उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
‘लालूजी तुम्ही काळ्या वा पांढऱ्या कबुतराचा बळी देणे वा धूर सोडणे आणि धूळ उडविण्यासाठी मोकळे आहात. तुम्हाला जर असेच करायचे असेल तर तुम्ही आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनता दलऐवजी राष्ट्रीय जादूटोणा पार्टी असे ठेवले पाहिजे आणि पक्षप्रमुख या नात्याने मग तुम्ही जगातील सर्वांत मोठे तांत्रिक बनाल. लोकशाही जनतेच्या आशीर्वादाने चालते, तांत्रिकाच्या तंत्रमंत्राने नाही. अठराव्या शतकातील मानसिकता असलेली व्यक्ती बिहारचा विकास करू शकते काय? अशा लोकांना बिहारबाहेर घालवा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
बचाव करणे अवघड
भागवत यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका मांडल्याने आम्हाला बचाव करणे अवघड झाले आहे. त्यात व्ही.के.सिंग यांनी दलितांबद्दल केलेल्या विधानाची भर पडली आहे. या दोघांच्या विधानांमुळे आम्हाला स्पष्टीकरण देताना दबाव आला आहे. काही वेळा अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी कबुली मांझी यांनी एका कार्यक्रमात दिली. (वृत्तसंस्था)
> बिहारच्या युवकांना रोजीरोटीसाठी राज्याबाहेर पलायन करण्यास बाध्य करून ‘बाहेरचे’ कुणी बनविले, हे परमआदरणीय लोकशाहीवादी नितीशजी आणि सर्वांत मोठे तांत्रिक लालूजींना मी विचारू इच्छितो.’
ते म्हणाले, ‘राज्याच्या सर्व समस्यांसाठी बडे भाई (लालूप्रसाद) आणि छोटे भाई (नितीशकुमार) जबाबदार आहेत. केवळ रालोआच राज्याचा विकास करू शकते. बिहारच्या युवकांना बेरोजगारीमुळेच राज्याबाहेर पलायन करावे लागत आहे.
>>वादांमुळे रालोआवर दबाव - मांझींचा घरचा अहेर पाटणा :
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा समोर असताना रालोआ दबावाखाली आल्याचे सांगत हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी घरचा अहेर दिला आहे. विशेषत: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची केलेली मागणी, तसेच हरियाणातील फरिदाबाद येथे दलिताचे घर पेटवून देण्यात आल्याबद्दल राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाकडे त्यांनी लक्ष वेधले.
>>पंतप्रधानांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
नवी दिल्ली : पुढच्या वर्षापासून केंद्रातील कनिष्ठ पदांसाठी मुलाखतीची गरज राहणार नाही, अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामागे आरक्षण धोरण संपविण्याचा कट आहे, असा स्पष्ट आरोप बिहारमधील महाआघाडीचे घटक पक्ष असलेले संयुक्त जनता दल आणि काँग्रेसने केला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक घेतली जात असताना मोदींनी ही घोषणा केली. मोदींच्या या घोषणेमुळे ‘आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे,’ या रा. स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या आवाहनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे संजदचे सरचिटणीस त्यागी यांनी म्हटले आहे.