"महिलेसोबत कसं बोलावं हे मुख्यमंत्री विसरलेत...", नितीश कुमारांच्या विधानावर महिला आमदाराची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:42 PM2024-07-24T13:42:06+5:302024-07-24T13:43:53+5:30
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीच्या महिला आमदार रेखा देवी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
पाटणा : बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीच्या महिला आमदार रेखा देवी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यावर महिला आमदार म्हणाल्या की, तुम्ही सर्वांचे मुख्यमंत्री आहात. एका महिलेसोबत बोलण्याची एक पद्धत असते. पण, महिलेसोबत कसं बोलावं ही पद्धतच मुख्यमंत्री विसरले आहेत.
एका वृत्तवाहिनीशी आरजेडीच्या महिला आमदार रेखा देवी यांनी संवाद साधला. यावेळी आरजेडी आमदार म्हणाल्या की, "मुख्यमंत्री महिलेला म्हणतात की, त्यांना काही कळत नाही. महिला कशी आली? मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अपमान करणं थांबवावं, महिलांना सन्मान द्यावा. प्रत्येक घरात महिला ही आई, सून, मुलगी, बहीण असते आणि मुख्यमंत्री असं बोलतात."
मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलींसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, असं आमदार रेखा देवी यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, "मुलींना पुढे करतात, पण मुलींसोबक काय होत आहे, ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही. मुली कुठेतरी सुरक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागावी."
दरम्यान, बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीशकुमार बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधक आरक्षणाबाबत आंदोलन करत होते. नितीश कुमार आपल्या भाषणादरम्यान विरोधी आमदारांना संपूर्ण प्रकरण एकदा ऐकून घेण्याचे वारंवार आवाहन करत होते. दरम्यान, आंदोलक आरजेडी आमदार रेखा देवी यांच्यावर ते संतापले. मुख्यमंत्र्यांनी आरजेडी आमदाराला सांगितले की, त्या महिला आहेत, त्यांना काही कळत नाही. दरम्यान, यावेळी नितीश कुमार जात जनगणनेबाबत आपले मत मांडत होते.