आर.के. नगर पोटनिवडणुकीत दिनकरन यांचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 01:48 PM2017-12-24T13:48:06+5:302017-12-24T18:21:09+5:30
वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे.
चेन्नई - वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी दणदणीत विजय मिळवला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिनकरन हे शशिकला यांचे पुतणे आहेत.
दरम्यान, मतमोजणीत मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन यांना आपणच अम्मांचे खरे वारस असून, तामिळनाडूमधील सरकार पुढच्या तीन महिन्यांत कोसळेल, असा दावा केला होता. झालेल्या एकूण 1 लाख 96 हजार 889 मतदानापैकी दिनकरन यांना 89 हजार 13 मते मिळाली. त्यांनी एकूण 40 हजार 707 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अण्णा द्रमुकचे उमेदवार ई. मधुसुधनान यांना 48 हजार 306 मते मिळाली, तर द्रमुकच्या मारुदू गणेश यांना 24 हजार 651 मते मिळाली. भाजपाचे कारू नागराजन यांना 1417 मते मिळाली.
Official EC Final Result: TTV #Dhinakaran at 89013 votes, #AIADMK's E. Madhusudhanan at 48306 votes, #DMK's N. Marudhu Ganesh at 24651, #BJP's Karu Nagarajan at 1417 votes at the end of counting. #Dhinakaran wins by 40707 votes #RKNagarElectionResultpic.twitter.com/01g7Qknx1h
— ANI (@ANI) December 24, 2017
दरम्याान, मतमोजणीमध्ये सकाळीच मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन म्हणाले होते की, आर.के. नगर मतदारसंघातून अम्मा निवडणूक लढत असत. या पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेल्या कौलाचा विचार केला तर एआयएडीएमके आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे भविष्य काय आहे, हे निश्चित झाले आहे. मी आर.के. नगर मतदारसंघातील जनता आणि पक्षाच्या समर्थकांचे आभार मानतो.
आर.के. नगर मतदारसंघातील मतमोजणीमध्ये सहाव्या फेरीअखेर टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मोठी आघाडी घेतली होती, तेव्हापासून त्यांच्या विजय निश्चित मानण्यात येत होता.
I firmly believe that it is time for this government to go, and in the coming 3 months you will see this government go: TTV Dhinakaran in Madurai #RKNagarByPollpic.twitter.com/v5uhgQ6T3J
— ANI (@ANI) December 24, 2017
दरम्यान, दिनकरन यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. तर अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते संतप्त झाले असून. त्यांनी मारहाण करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. तसेच इव्हीएमला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला आहे.
#UPDATE Official EC trends: TTV Dhinakaran leads with 29255 total votes, AIADMKs E. Madhusudhanan gets 15181 votes and DMK's N. Marudhu Ganesh gets 7986 votes at the end of counting round 6 #RKNagarByPoll
— ANI (@ANI) December 24, 2017
आर.के.नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत दिनकरन यांची सरशी झाल्याने अण्णा द्रमुक पक्षातील बंडाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच दिनकरन यांचा विजय हा पलानीस्वामी आणि पनिरसेल्वम यांच्यासाठी धक्का मानण्यात येत आहे.
I am an independent candidate for namesake but all Party (AIADMK) workers are with me. I also have Amma's wishes: TTV Dhinakaran in #Chennaipic.twitter.com/VqF9cvM0qx
— ANI (@ANI) December 24, 2017