भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:00 PM2019-04-04T16:00:59+5:302019-04-04T16:54:13+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे.

RLP joins hands with BJP in Rajasthan | भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'

भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'

Next

नवी दिल्ली -  गतवर्षांच्या अखेरीस राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजस्थानमधील पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे. राजस्थानमधील मारवाड भागात प्रभाव असणाऱ्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपानेही त्यांना नागौर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, बेनिवाल यांचा एनडीएमधील प्रवेश हा काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

 एनडीएमध्ये दाखल झालेले बेनिवाल म्हणाले की, ''आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वोच्च आहे. भाजपाने नागौर मतदारसंघ आरएलपीसाठी सोडला आहे. आता राजस्थानमधील 24 जागांसोबतच हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आरएलपीचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील. सत्तेत असताना काँग्रेसने देशाला लुटण्याचे कामच केले आहे. आता राजस्थानमध्येही 25-0 असा निकाल लागेल.काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.'' 





यावेळी भाजपाचे राजस्थान प्रभारी प्रकाश जावडेकर आणि प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी बेनिवाल यांच्या पक्षासोबत आघाडी झाल्याने समाधाम व्यक्त केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना हनुमान बेनिवाल म्हणाले की,''देशहित विचारात घेऊन आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये तिसऱ्या मोर्चाचे अस्तित्व दिसून येत नाही. मी सुरुवातीपासूनच भाजपामध्ये होतो. आजच्या घडीला जर कुणी पाकिस्तान आणि चीनला धाकात ठेवू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच  आहेत.'' 

 आरएलपीचे प्रमुख हनुमान बेनिवाल हे खिंवसर मतदारसंघातून आमदार असून, ते या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सातत्याने निवडून येत आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली होती. मात्र बेनिवाल हे एनडीएमध्ये आले असले तरी त्यांचे भाजपा नेत्या वसुंधरा राजेंशी फार पटत नाही. ही बाब भाजपासाठी चिंतेची आहे. दरम्यान, हनुमान बेनिवाल एनडीएमध्ये आल्याने जाट मतदारांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.  

Web Title: RLP joins hands with BJP in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.