भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:34 AM2022-02-20T11:34:21+5:302022-02-20T11:42:21+5:30

Road Accident : स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

road accident in buxar four died on the spot scorpio and bus collision | भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी 

फोटो - आजतक

Next

नवी दिल्ली - लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसवर काळाने घाला घातला आहे. लग्नासाठी चाललेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिहारमध्ये भीषण अपघात झाला असून या चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. बिहार राज्यातील बक्सर येथे संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. 

बक्सरच्या कृष्ण ब्रम्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मोठा अपघात घडला असून यामुळे ऐन लग्नाच्यावेळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. ओव्हर टेकिंगच्या नादात हा अपघात झाल्याचं म्हटलं आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती थरकाप उडवणारी आहे. 

स्कॉर्पिओमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू

हरेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. लग्न लावण्यासाठी कुटुंबीयात मोठ्या उत्साहात घरातून निघाले होते. याच दरम्यान, एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं ओव्हरटेक करण्याच्या नादात लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला समोरासमोरच जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की वाहनांचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू झालाय. तर सहापेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. 

ओव्हरटेकिंगच्या नादात हा भीषण अपघात घडला

भीषण अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या हरेंद्र यादव यांनी चार जणांचा या अपघातात जागीच जीव गेला. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांमध्ये चारही जण हे पुरुष असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आता या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील मृत्यू झालेले प्रवासी आतमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न पोलिसांनी पडला होता. ओव्हरटेकिंगच्या नादात हा भीषण अपघात घडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: road accident in buxar four died on the spot scorpio and bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.