मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 02:38 PM2023-07-16T14:38:17+5:302023-07-16T14:39:04+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असून सीआरपीएफची गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहेत.

Road accident in Jammu and Kashmir's Ganderbal district leaves 8 CRPF personnel injured, know here details | मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

googlenewsNext

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असून सीआरपीएफची गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहेत. या अपघातात ८ जण जखमी झाल्याचे समजते. निलगिरी हेलिपॅडजवळ हा अपघात झाला असून, सर्व जखमी जवानांना बालटालच्या बेस कॅम्प रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, HR36AB/3110 या नंबरची गाडी CRPF जवानांना घेऊन जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंध नदीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा सीआरपीएफचे जवान बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक आलोक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ तास इथे पर्यटकांचा प्रवास असो किंवा नसो आम्ही सेवेसाठी तैनात असतो. पण यात्रेच्या पार्श्वभूमीवर फौजफाट्यांची संख्या वाढवण्यात आली असून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.

अमरनाथ यात्रेसाठी CRPF जवान तैनात

तसेच सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक म्हणाले की, सीआरपीएफ दक्षिण काश्मीरमध्ये सर्वत्र पाळत ठेवण्यासाठी आधुनिक उपकरणे आणि शस्त्रे वापरत आहे. आम्ही जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. अमरनाथच्या पवित्र गुहेत सुरू असलेल्या यात्रेला काही धोका आहे का, असे विचारले असता, अधिकारी म्हणाले की, सीआरपीएफ वर्षभर शांतता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि ते नेहमी सुरू राहिल. 
 

Web Title: Road accident in Jammu and Kashmir's Ganderbal district leaves 8 CRPF personnel injured, know here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.