सनी लिओनीमुळे रस्ते ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:10 AM2017-08-19T01:10:18+5:302017-08-19T01:10:21+5:30
अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली
कोची : अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी आयोजक मोबाइल स्टोअरच्या मालकासह १०० जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी सांगितले की, एमजी रोडवरील दुकानाच्या उद्घाटनासाठी सनी लिओनी आली, तेव्हा झालेल्या गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. या प्रकरणी पोलिसांनी मोबाइल स्टोअरचा मालक आणि १०० जणांवर भादंविच्या कलम २८३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रस्ता रोखल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या गर्दीमुळे या भागातील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.
>सनीला पाहण्यासाठी आलेल्या या गर्दीचे फोटो एव्हाना सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मार्गावरील वाहतूक अक्षरश: ठप्प झाली होती. रस्त्यावर उभे राहण्यास जागा नसल्याने, अनेकांनी जवळच्या इमारतींच्या गच्चीवर धाव घेतली. त्यानंतर सनी लिओनीने टिष्ट्वट करून कोचीमधील रहिवाशांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर तर या गर्दीची तुलना ओबामा आणि ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याशी करण्यात आली.