कारची काच फोडून ५४ लाखांची बॅग लांबवली दुचाकीस्वारावर संशय: कार पंर झाल्याचे सांगितले रस्त्यात
By admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:02+5:302016-07-18T23:32:02+5:30
जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल कोठारी यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी सोमवारी ते काका ईश्वरलाल किसनलाल कोठारी यांच्या मालकीची कार (क्र.एम.एच.१९ बी.यु.८०८७) घेऊन जळगावात आले होते. कोठारी कार्पोरेशन, प्रणव ट्रेडर्स व प्रकाशचंद्र किसनलाल कोठारी आदी प्रत्येकी नावाचे दोन असे सहा धनादेश (प्रत्येकी ९ लाख) त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत वटविण्यासाठी जमा केले.अडीच वाजता त्या धनादेशाची एकूण ५४ लाखांची रोकड ताब्यात घेतली. हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवून ती बॅग कारमध्ये ठेवली. नंतर कोठारी हे जामनेरला जाण्यासाठी आकाशवाणीमार्गे निघाले असता आकाशवाणी चौकापासून काही अंतरावर मागून आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी कार पंर झाल्याचे त्यांना सांगितले. मात्र कोठारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कार अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या पंर दुकानावर नेली. दुकानदाराला पंर काढण्याचे सांगितले. तेथे ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असतानाच कारजवळ जावून पाहिले तर मागील डाव्या बाजूचा काच फुटलेला होता व सीटवरील रोकड असलेली बॅगही गायब झालेली होती.