रोड रोमिओला मिळणार २२० व्होल्टचा शॉक

By admin | Published: February 9, 2016 04:05 PM2016-02-09T16:05:32+5:302016-02-09T18:27:54+5:30

रस्त्यावरच्या रोड रोमिओंपासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी राजस्थानमध्ये एका युवकाने 'शॉकिंग ग्लोव्ह' नावाचे एक उपकरण तयार केले आहे.

Road Romio to get 220 Vault Shock | रोड रोमिओला मिळणार २२० व्होल्टचा शॉक

रोड रोमिओला मिळणार २२० व्होल्टचा शॉक

Next

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. ९ - रस्त्यावरच्या रोड रोमिओंपासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी राजस्थानमध्ये एका युवकाने  'शॉकिंग ग्लोव्ह' नावाचे एक उपकरण तयार केले आहे. फक्त १५० ग्रॅम वजनाचे हे उपकरण हाताच्या मनगटावर बांधता येते. छेड काढणा-या रोमिओला या उपकरणाचा स्पर्श झाला तर, २२० व्होल्टचा शॉक बसतो. 
या उपकरणाचे अन्य फायदेही आहेत. मुलगी कुठे फसली आहे त्याची माहिती मिळते त्याशिवाय या उपकरणाव्दारे संदेश पाठवता येतो आणि घटनेचे चित्रीकरणही करता येते. यावर्षी जानेवारी महिन्यात राज्यस्तरीय विज्ञान परिषदेत या उपकरणाला पहिल्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाल्यानंतर सरकारचे या उपकरणाकडे लक्ष गेले. 
दिल्लीमध्ये मार्च महिन्यात होणा-या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत हे उपकरण मांडण्यात येणार आहे. १७ वर्षाच्या निरंजन सुथार या युवकाने हे उपकरण बनवले आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील अहोर सरकारी शाळेत तो १२ वी च्या वर्षाला आहे. विशेष म्हणजे तो कला शाखेचा विद्यार्थी आहे. 
दहावीत कमी मार्क्स मिळाल्यामुळे निरंजनला विज्ञान शाखेला प्रवेश घेता आला नाही. पण त्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणाची आवड होती. संपूर्ण देशभरात गाजलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या घटनेनंतर त्याने मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपकरण बनवण्याचा ध्यास घेतला. त्यानंतर दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर  त्याने हे उपकरण बनवले. 
'शॉकिंग ग्लोव्ह' असे त्याने या उपकरणाला नाव दिले आहे. या ग्लोव्हमध्ये सीम कार्ड, जीपीएस चीप, व्हिडीओ कॅमेरा आणि ३.४ व्हॉल्टची बॅटरी आहे. 

Web Title: Road Romio to get 220 Vault Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.