गुजरातमध्ये मोदींचा 10 किलोमीटरपर्यंत रोड शो
By admin | Published: April 16, 2017 09:54 PM2017-04-16T21:54:57+5:302017-04-16T22:06:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमधल्या सुरतमध्ये भाजपानं 10 किलोमीटरपर्यंत रोड शो काढला आहे.
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमधल्या सुरतमध्ये भाजपानं 10 किलोमीटरपर्यंत रोड शो काढला आहे. विशेष म्हणजे भाजपाचा हा रोड शो अडीच तासांत पूर्ण करण्यात आला. पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान हात उंचावून जनतेला अभिवादन केले. रोड शोच्या वेळी महिलांनी आकर्षक कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. गुलाबी रंगाचं टी-शर्टमध्ये 90 महिला बायकर्सच्या ताफ्याचा लवाजमा मोदींच्या गाडीभोवताली होता.
रोड शोमध्ये 25 हजार बाईकवर 50 हजार लोक मोदींच्या मागोमाग होते. रोड शोनंतर मोदी सर्किट हाऊसमध्ये दाखल झालेत. आज रात्री ते येथेच वास्तव्याला राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 400 कोटी रुपयांच्या किरण मल्टी सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर मोदी इच्छापूर गावाला भेट देणार असून, तिथल्या एका पॉलिशिंग युनिटचंही उद्घाटन करणार आहेत. गुजरातमधील अनेक प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत दाखल होणार आहेत.
(ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिला त्रस्त- नरेंद्र मोदी)
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशात असहिष्णुता वाढल्याचं कारण देत पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिक आता कुठे आहेत. विरोधक प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एक नवा मुद्दा उखरून काढत होते. बिहार निवडणुकांच्या आधी पुरस्कार परत करण्यात आले होते. सध्या पुरस्कार परत करणारे कुठे आहेत ?, त्यानंतर दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा मुद्दा उचलला जातोय. मला वाटतं विरोधकांकडे नवे मुद्दे जन्माला घालण्याचा कारखाना आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिकांसोबतच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये मिळालेला विजय हा ऐतिहासिक असल्याचं म्हणत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.
WATCH LIVE: PM Modi"s roadshow in Surat, Gujarat https://t.co/qNrBla3UYR
— ANI (@ANI_news) April 16, 2017