पोलिसांना लुटारू मानेना
By admin | Published: December 8, 2015 01:52 AM2015-12-08T01:52:03+5:302015-12-08T01:52:03+5:30
कोतवाली, इमामवाड्यात चेनस्नॅचिंग
Next
क तवाली, इमामवाड्यात चेनस्नॅचिंग नागपूर : अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत आलेल्या हजारो पोलिसांना न जुमानता उपराजधानीत लुटारूंनी आपला हैदोस सुरूच ठेवला आहे. सोमवारी अवघ्या अर्ध्या तासात दोन महिलांचे दागिने हिसकावून नेले. चंदननगर पीटीएस क्वॉर्टरमधील रहिवासी शीला संदन भौमिक (वय ३६) या सोमवारी दुपारी ११.४५ ला आपल्या मुलीला रायसोनी कॉलेजला सोडून ॲक्टिव्हाने घरी परत जात होत्या. मोटरसायकलने आलेल्या दोन लुटारूंनी शीला यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर नैना नारायणराव भाके (वय ५२, रा. सेंट्रल एव्हेन्यू भावसार चौक) या पायी घरी जात होत्या. चितार ओळीत पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी नैना यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. कोतवाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यातील साम्य बघता एकाच आरोपींनी त्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे. ---विष घेऊन आत्महत्यानागपूर : नरेंद्रनगरातील नगर विकास सोसायटीत राहणारे विनय रामप्रकाश बिटले (वय ३२) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विनय यांच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत. ---नंदनवनमध्ये तरुणाने जाळून घेतलेनागपूर : नंदनवनमधील एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. शेषनगरात सोमवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. अतुल अशोक काटीले (वय ३०) असे गंभीररीत्या जळालेल्या तरुणाचे नाव आहे.तो नंदनवनच्या शेषनगरात राहत होता. अचानक दुपारी ३ च्या सुमारास अतुल ज्वाळाने वेढलेल्या अवस्थेत किंचाळत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. शेजाऱ्यांनी लगेच धाव घेऊन त्याला विझविले. मात्र, अतुल ५० ते ६० टक्के भाजला होता. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अतुलने नेमके कोणत्या कारणामुळे स्वत:ला पेटवून घेतले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.--