मालकाला लुटलं आणि ढोलकीत लपवली लाखोंची रोकड; पाहून पोलिसही झाले चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:38 PM2022-11-07T20:38:11+5:302022-11-07T20:39:21+5:30

मालकाला लुटून चालक गावी पळून गेला, पोलिसांनी छापा टाकून पकडलं अन्...

Robbed the owner and hid lakhs of cash in the drum; Even the police were shocked | मालकाला लुटलं आणि ढोलकीत लपवली लाखोंची रोकड; पाहून पोलिसही झाले चकीत

मालकाला लुटलं आणि ढोलकीत लपवली लाखोंची रोकड; पाहून पोलिसही झाले चकीत

Next


नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी 'ढोल' चित्रपट आला होता. त्यात एका ढोलकीत पैसे लपवल्याचे दाखवण्यात आले होते. तसाच काहीसा प्रकार नवी दिल्लीत घडला आहे. एका चालकाने मालकाचे 18 लाख रुपये उडवले आणि ढोलकीमध्ये रोकड लपवून चालक पिलीभीतला आपल्या घरी गेला. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पीलीभीत पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरावर छापा टाकला. पोलिसांना आरोपी ड्रायव्हरच्या घरी एक डोलकी सापडली, त्यातून ही संपूर्ण रोकड बाहेर आली. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आणि दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलसांडाचा रहिवासी पवन कुमार शर्मा दिल्लीतील व्यापारी बीके सभरवाल यांचा ड्रायव्हर होता. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी ड्रायव्हर पवन बीके सभरवाल यांना दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे एका मीटिंगसाठी घेऊन गेला होता. त्यावेळी गाडीत 20 लाखांची रोकड होती. यादरम्यान चालक पवन याने बीके सभरवाल यांना खाली उतरवून कार पार्क करण्याच्या बहाण्याने 20 लाख रुपये आणि गाडीची चावी घेऊन पळ काढला.

याप्रकरणी व्यावसायिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली 
यानंतर व्यापारी बीके सभरवाल यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पिलीभीत पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर दिल्ली पोलिसांनी पिलीभीतच्या बिलसांडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांसह आरोपी पवन शर्माच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी त्याला पकडून पैशांबाबत चौकशी केली असता, तो बराच वेळ पोलिसांना गुंतवत राहिला.

पोलिसांची कडक चौकशी, आरोपी सत्य सांगितले
पोलिसांनी पवनची कसून चौकशी केली असता त्याने हे पैसे ढोलकीत ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी ढोलकी फोडून रक्कम जप्त केली. याशिवाय उर्वरित दोन लाख रुपयांबाबत त्यांनी ते पैसे खर्च केल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक करून घेऊन गेले.

Web Title: Robbed the owner and hid lakhs of cash in the drum; Even the police were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.