कैलाश सत्यार्थींच्या घरी झालेल्या चोरीचा छडा, नोबेलची प्रतिकृती जप्त
By admin | Published: February 12, 2017 09:45 AM2017-02-12T09:45:11+5:302017-02-12T09:45:11+5:30
नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरून चोरीस गेलेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरून चोरीस गेलेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी सत्यार्थींच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावताना तीन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून नोबेल पुरस्काराची प्रतिकृती, मानपत्र आणि दागिने जप्त केले आहेत.
गेल्या आठवड्यात सोमवारी सत्यार्थी यांच्या घरातून नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसह दागिन्यांची चोरी चोरट्यांनी केली होती. दिल्लीतील कालका जी परिसरातील कैलाश कॉलनीमधील अरावली अपार्टमेंटमध्ये सत्यार्थींचे घर आहे. सत्यार्थींच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी घरातील दागिने आणि रोख रोकडही लंपास केली होती.
सन 2014 मध्ये जगात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार भारतातील बालहक्कांसाठी काम करणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आला होता.
#UPDATE: Along with recovery of stolen valuables incl. replica of Kailash Satyarthi's Nobel Peace Prize, 3 ppl have been arrested by Police
— ANI (@ANI_news) February 12, 2017