मनी लॉड्रिंगप्रकरणी 'ईडी'कडून रॉबर्ट वाड्रा यांची पुन्हा चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:02 AM2019-05-29T10:02:46+5:302019-05-29T10:15:06+5:30
दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन स्क्वेअरच्या लंडन प्रकरणात बेनामी मालमत्तेच्या संबंधात निवडणुकीपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांची तीन दिवस चौकशी केली होती.
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची मनी लॉड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून(ईडी) गुरुवारी (दि३०) पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत वाड्रा यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. ईडीकडून, या प्रकरणात आधीच चौकशी करण्यात आली आहे, परंतु आता पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन स्क्वेअरच्या लंडन प्रकरणात बेनामी मालमत्तेच्या संबंधात निवडणुकीपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून तीन दिवस चौकशी केली गेली होती. वाड्रा यांची आता पुन्हा याच प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. याबाबत वाड्रा यांना नोटीस देण्यात आली आहे.
Enforcement Directorate has summoned Robert Vadra tomorrow for questioning in connection with land deal cases of Delhi NCR,Bikaner and other properties. (file pic) pic.twitter.com/nOyzQppsq2
— ANI (@ANI) May 29, 2019
याआधी ७ फेब्रुवारीला रॉबर्ट वाड्रां यांची अमलबजावणी संचनालय म्हणजेच ईडीनं ६ तास चौकशी केली होती. या चौकशीत त्यांना ३६ प्रश्न विचारले गेले होते. सोबतच वाड्रांना ईमेल आणि कागदपत्रांची विचारणा केली गेली होती.