रॉबर्ट वद्रा यांची लंडनमध्ये बेनामी मालमता ?
By admin | Published: May 31, 2016 10:06 AM2016-05-31T10:06:07+5:302016-05-31T10:12:22+5:30
शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारीच्या व्यवहारांच्या चौकशीमध्ये त्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारीच्या व्यवहारांच्या चौकशीमध्ये त्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. आयकर खात्याने संजय भंडारीचे व्यवहार तपासले त्यातून ही बाब समोर आली. मध्य लंडनमधील एका घराच्या खरेदीशी रॉबर्ट वद्रा यांचे नाव जोडले जात आहे.
आयकर खात्याने मागच्या महिन्यात भंडारीच्या घर, कार्यालयावर छापे मारुन काही कागदपत्रे जप्त केली. व्रदा आणि भंडारीचा सहकारी सुमित चड्डा यांच्यामध्ये २००९ मध्ये लंडनमधील घर १९ कोटींना खरेदी करण्यासंबंधी ईमेल पाठवण्यात आले होते. जून २०१० मध्ये घर विकण्यापूर्वी या लंडनमधील घराच्या दुरुस्तीसंदर्भातील काही ई-मेल आहेत.
वद्रा यांचे कायदेशीर कामकाज संभाळणा-या संस्थेने रॉबर्ट वद्रा यांच्यावर होत असलेला लंडनमधील घर खरेदीचा आरोप फेटाळून लावला आहे. वद्रा यांचा या घराशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काहीही संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
भंडारी आणि चड्डा यांच्याशी वद्रा यांचे कुठलेही व्यावसायिक संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले आहे. दुस-या बाजूला भाजपकडून या विषयाला राजकीय मुद्दा बनवण्याची तयारी सुरु असून, भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीला पत्र लिहून या घर खरेदीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.