गुरगावमध्ये रोबोनं घेतला कर्मचा-याचा जीव

By admin | Published: August 13, 2015 01:58 PM2015-08-13T13:58:25+5:302015-08-13T13:58:25+5:30

एका कारखान्यातल्या रोबोच्या हातून एक कामगार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली असून रोबो किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Roboone employee in Gurgaon | गुरगावमध्ये रोबोनं घेतला कर्मचा-याचा जीव

गुरगावमध्ये रोबोनं घेतला कर्मचा-याचा जीव

Next
>ऑनलाइन लोकमत
गुरगाव, दि. १३ - एका कारखान्यातल्या रोबोच्या हातून एक कामगार ठार झाल्याची घटना बुधवारी घडली असून रोबो किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हॉलीवूडच्या एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रकार वाहन उद्योगाला लोखंडाच्या शीटचा पुरवठा करणा-या माणेसरमधल्या एसकेएच मेटल्समध्ये घडला.
लोखंडाच्या शीट सारख्या करण्यासाठी रामजी लाल हा कामगार रोबोच्या एकदम जवळ गेला असताना रोबोच्या हालचालींमुळे काही वेल्डिंगचे रॉड रामजी लालच्या पोटात घुसले. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असता मृत घोषित करण्यात आलं.
रामजी लालच्या सहका-यांच्या सांगण्यानुसार रोबोच्या जवळ काही काम करायचं असल्यास, रोबोला बंद करावं लागतं ते केलेलं नव्हतं, तर काही तज्ज्ञांच्या मते रोबोंमुळे अपघात होणार नाहीत अशी प्रणालीच नसल्यामुळे हा अपघात झाला आहे.
दुर्देवाची बाब म्हणजे मूळचा उत्तर प्रदेशमधला असलेल्या रामजीलालचं गेल्याच वर्षी लग्न झालं होतं आणि पत्नी व चार बहिणींसह तो गुरगावमध्ये रहात होता.
मारूति उद्योगच्या कामगार संघटनांनी नुकसानभरपाई तसेच सखोल चौकशीची मागणी केली असून जिथे जिथे रोबोंच्या माध्यमातून कामं होतात तिथे अपघात टालणारी यंत्रणा ठेवण्याची मागणी केली आहे.

Web Title: Roboone employee in Gurgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.