जय हो! इस्रो बनवणार स्वत:चं स्पेस स्टेशन, सादर केला २०३५ पर्यंतचा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:46 PM2022-10-30T18:46:39+5:302022-10-30T18:47:44+5:30
भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे.
भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे. ISRO ने जड पेलोड्स कक्षेत टाकण्याचा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रॉकेटला नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल्स (NGLV) असे म्हणतात. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळ संस्था रॉकेटच्या डिझाईनवर काम करत आहे आणि त्याच्या विकासात उद्योगांनी सहकार्य करावे अशी त्यांची इच्छा आहे.
विकास प्रक्रियेत उद्योग क्षेत्रालाही सोबत आणण्याचा मानस आहे. आम्हाला सर्व पैसे गुंतवण्याची गरज नाही. आपल्या सर्वांसाठी हे रॉकेट तयार करण्यासाठी उद्योग जगतानंही गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. रॉकेट १० टन पेलोड जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) किंवा २० टन पेलोड कमी पृथ्वीच्या कक्षेत नेण्याची योजना आहे, असं सोमनाथ म्हणाले.
इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवीन रॉकेट उपयुक्त ठरेल कारण भारत २०३५ पर्यंत आपले स्पेस स्टेशन स्थापन करण्याची योजना आखत आहे आणि अंतराळ मोहिमा, मानवयुक्त अंतराळ उड्डाण, मालवाहू मोहिमा आणि एकाच वेळी अनेक संचार उपग्रह कक्षेत ठेवण्यास सक्षम असेल. NGLV मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी एक साधे, मजबूत मशीन म्हणून डिझाइन केलं आहे. यामुळे अंतराळातील वाहतूक किफायतशीर होणार आहे.
२०३० पर्यंत लॉन्चिंगची योजना
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) 1980 च्या दशकात विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि भविष्यात रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. ISRO ने एका वर्षात NGLVs डिझाइन करण्याची योजना आखली आहे आणि २०३० मध्ये त्याच्या पहिल्या लॉन्चसह उत्पादनासाठी उद्योगाला ऑफर केले जाऊ शकते.
रॉकेटची किंमत हजारो डॉलर्स
NGLV हे मिथेन आणि द्रव ऑक्सिजन वापरून हरित इंधनावर चालणारे तीन-टप्प्याचे रॉकेट असू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला एका परिषदेत सोमनाथ यांनी मांडलेल्या योजनेनुसार, NGLV पुन्हा वापरता येण्याजोग्या स्वरूपात प्रति किलो १,९०० डॉलर खर्च अपेक्षित आहे.