रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडणार -राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 12:22 PM2018-07-31T12:22:09+5:302018-07-31T12:53:34+5:30
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न आज संसदेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित झाला
नवी दिल्ली - देशात अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना माघारी धाडण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केली. रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न आज संसदेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित झाला. त्याला उत्तर देतारा राजनाथ सिंह यांनी ही घोषणा केली. दरम्यान, सरकारकडून बांगलादेशमध्ये राहणाऱ्या रोहिंग्यांसाठी ऑपरेशन इन्सानियत सुरू आहे. मात्र भारतात राहणाऱ्यांसाठी काहीच करण्यात आले नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केला.
राजनाथ सिंह म्हणाले, राज्य सरकारांनी रोहिंग्यांची मोजणी करावी. रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नाबाबत केंद्राकडून राज्य सरकारांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. राज्यातील रोहिंग्यांच्या संख्येबाबत राज्य सरकारांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती द्यावी. त्याआधारावर संबंधित माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली जाईल. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय याबाबत म्यानमारशी त्यांना परत पाठवण्याबाबत चर्चा करेल."
Border Security Force and Assam Rifles are deployed to stop further infiltration of #Rohingyas. Have issued advisory to states to monitor those who have already come and keep them at one place and not let them spread. States also have right to deport them: HM Rajnath Singh in LS
— ANI (@ANI) July 31, 2018
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी रोहिंग्या हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे."रोहिंग्या निर्वासित जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने राहत आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे सरकार सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही. म्यानमार सरकारसोबत चर्चा करून शांततापूर्ण मार्गाने त्यांना परत पाठवले जाईल."