रोहिंग्यांची गावे आता शांत आहेत, आंतरराष्ट्रीय चौकशीला घाबरत नाही - सू की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:27 AM2017-09-20T04:27:20+5:302017-09-20T04:27:22+5:30

म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिमांच्या पलायनामुळे जगभरातून टीकेचे कारण बनलेल्या आलेल्या म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांनी रोहिंग्यांची गावे आता शांत होत असून, या प्रकरणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चौकशीला आम्ही घाबरत नाही.

Rohingyas are quiet now, not afraid of international investigations - Soo | रोहिंग्यांची गावे आता शांत आहेत, आंतरराष्ट्रीय चौकशीला घाबरत नाही - सू की

रोहिंग्यांची गावे आता शांत आहेत, आंतरराष्ट्रीय चौकशीला घाबरत नाही - सू की

Next

नेपीताव : म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिमांच्या पलायनामुळे जगभरातून टीकेचे कारण बनलेल्या आलेल्या म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांनी रोहिंग्यांची गावे आता शांत होत असून, या प्रकरणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चौकशीला आम्ही घाबरत नाही. गेल्या एका महिन्यात शेकडो लोकांच्या हत्या झाल्या. त्यामुळे किमान ४,१२,००० रोहिंंग्या बांग्लादेशात पळून गेले आहेत. तरीही मोठ्या संख्येने मुस्लीम संकटग्रस्त भागात राहत आहेत. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गावे सुरक्षित आहेत.
या हिंसाचारामुळे ‘नोबेल’ पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांच्या जागतिक पातळीवरील प्रतिमेला तडे गेले आहेत. विदेशी राजनैतिक अधिकाºयांशी बोलताना आंग सान सू की म्हणाल्या की, २५ आॅगस्ट रोजी म्यानमारच्या सुरक्षा दलावर रोहिंग्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर येथे हिंसाचार उसळला. त्यानंतर लाखो नागरिक विस्थापित झाले. सैन्याच्या कारवाईनंतर रोहिंग्या गावे सोडून पळाले, पण ५ सप्टेंबरनंतर एकाही गावात हिंसाचार झाला नाही वा मोहीम राबविण्यात आली नाही. तरीही रोहिंग्या मुस्लीम पळून जात आहेत. त्याची कारणे आम्हालाही माहीत नाहीत.
या घटनांसाठी सरकारने रोहिंग्यांना जबाबदार ठरविले आहे. पीडित समुदायाचे असे म्हणणे आहे की, सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. आंग सान सू की यांनी सांगितले की, ५ सप्टेंबरनंतर कोणताही हिंसाचार झाला नाही. तरीही काही लोक पळून जात असल्याने आम्ही चिंतेत आहोत. रोहिंग्या मुस्लीम सीमा पार करून बांग्लादेशात जात आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू इच्छितो.
बांग्लादेशच्या एका शिबिरात राहणारे अब्दुल हाफिज म्हणाले की, एके काळी सैन्यापेक्षा जास्त सू की यांच्यावर रोहिंग्या मुस्लीम विश्वास ठेवत होते. याच सैन्याने सू की यांना अनेक वर्षे नजरकैदेत ठेवले. सू की या खोटारड्या असल्याचे आता नाईलाजाने म्हणावे लागत आहे. (वृत्तसंस्था)
>स्वराज - हसीना चर्चा
न्यूयॉर्क : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. मात्र, यात रोहिंग्या विषयावर चर्चा झाली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही द्विपक्षीय चर्चा होती. बांग्लादेशात मोठ्या संख्येने रोहिंग्या मुस्लीम येत आहेत.
बांग्लादेशने आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करण्याची आणि म्यानमारवर दबाव आणण्याची मागणी केली आहे.

Web Title: Rohingyas are quiet now, not afraid of international investigations - Soo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.