ंआमदारांच्या हस्तक्षेपाला रोहिणी खडसेंचा चाप अतिक्रमण कारवाई : रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळील भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:39+5:302016-02-29T22:01:39+5:30

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून केल्या जात असलेल्या कारवाईत आमदार सुरेश भोळे यांच्याकडून वारंवार संबंधीत अधिकार्‍यांना फोन करून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर रस्त्यावरील कलेक्टर बंगला ते चर्च दरम्यानच्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला आमदारांमुळे कारवाई करता येत नसल्याचे समजल्याने रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आमदारांचा फोन आल्यास मला फोन करायला सांगा अशी सूचनाच संबंधीत अधिकार्‍यांना केली. त्यानंतर सोमवारी दुपारी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Rohini Khadseen's arcade encroachment proceedings for the intervention of the bureaucrats: Hundreds of vegetable vendors near the church seized on the Ramanandnagar road | ंआमदारांच्या हस्तक्षेपाला रोहिणी खडसेंचा चाप अतिक्रमण कारवाई : रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळील भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

ंआमदारांच्या हस्तक्षेपाला रोहिणी खडसेंचा चाप अतिक्रमण कारवाई : रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळील भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

Next
गाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून केल्या जात असलेल्या कारवाईत आमदार सुरेश भोळे यांच्याकडून वारंवार संबंधीत अधिकार्‍यांना फोन करून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर रस्त्यावरील कलेक्टर बंगला ते चर्च दरम्यानच्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला आमदारांमुळे कारवाई करता येत नसल्याचे समजल्याने रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आमदारांचा फोन आल्यास मला फोन करायला सांगा अशी सूचनाच संबंधीत अधिकार्‍यांना केली. त्यानंतर सोमवारी दुपारी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
त्यामुळे आमदारांकडून कुठल्याही कारवाईत फोन करून हस्तक्षेप करण्यास आळा बसेल, असे मानले जात आहे.
दरम्यान आयुक्तांकडे सुरू असलेल्या बैठकीतच नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनीही रोहिणी खडसे यांची तक्रार आयुक्तांच्या कानावर घालत अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे आयुक्तांनी अतिक्रमण अधीक्षकांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान, कैलास गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांनी कारवाई केली.


पाचव्यांदा कारवाई
या अतिक्रमणावर अतिक्रमण विभागातर्फे पाचव्यांदा ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र दरवेळी कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य परत मिळत असल्याने हॉकर्सचे अतिक्रमण जैसे-थे होत होते. तसेच अतिक्रमण विभागातील एक कर्मचारीच चिरीमिरी घेऊन या अतिक्रमणधारकांच्या गाड्या सोडून देत असल्याने अतिक्रमण जैसे-थे होत होते. आता नवीन ठरावानुसार जप्त केलेल्या वस्तू परत मिळणार नाहीत. त्यामुळे परत या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---- इन्फो---
लोटगाड्या, मालवाहू रिक्षा जप्त
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने या रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या, तसेच एक मालवाहू रिक्षाही जप्त करण्यात आली. ट्रकभरून हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यावरील भाजीपाला मात्र विक्रेत्यांना परत देण्यात आला. जप्त केलेला माल नवीन ठरावानुसार आता परत दिला जाणार नसून त्याचा लिलाव केला जाणार आहे.

Web Title: Rohini Khadseen's arcade encroachment proceedings for the intervention of the bureaucrats: Hundreds of vegetable vendors near the church seized on the Ramanandnagar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.