रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, आरएसएसला ते मान्य नव्हते. - राहुल गांधी
By admin | Published: February 23, 2016 04:24 PM2016-02-23T16:24:27+5:302016-02-23T16:24:27+5:30
रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची होती
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सरकार फक्त आपल्या यशाबद्दल बोलत आहे मात्र रोहित वेमुला किंवा हरियाणाबद्दल शब्दही उच्चारत नाही. रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची होती . विरोधी बोलणाऱ्यास संपवून टाकण्याचे संघाचे धोरण असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राहुल गांधी सहभागी झाले होते.
देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आज झालेल्या भाषणात त्यांनी आरएसएस व भाजपावर जारदार टीका केली. ते म्हणाले सरकारने सुरु केलेल्या योजनांबद्दल बोलण्यात येते, पण रोहित वेमुला व हरियानातील परिस्थितीबद्दल काहीच बोलण्यात येत नाही.