दिवसा टेहाळणी, रात्री रोहीत्र फोडण्याचा उद्योग रोहीत्राचे मायाजाल : मेहमूद शहा आहे टोळीचा मुख्य सूत्रधार
By admin | Published: November 28, 2015 11:54 PM2015-11-28T23:54:06+5:302015-11-28T23:54:06+5:30
क्राइम स्टोरी (मुख्य सूत्रधाराचा फोटो)
Next
क राइम स्टोरी (मुख्य सूत्रधाराचा फोटो)जळगाव : रोहित्राची चोरी प्रकरणात आठ महिन्यापासून फरार असलेल्या मेहमूद शहा बिसमिल्ला शहा फकीर (वय ४०, रा.बर्हाणपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बर्हाणपुर येथून जेरबंद केले. दिवसा शेतात टेहाळणी करुन रोहीत्र निित करणे व रात्री टोळीने जावून शेतातील वीज पुरवठा बंद करुन रोहित्राची चोरी करणे ही या टोळीची काम करण्याची पध्दत होती. विशेष म्हणजे मेहमूद हा नऊ जणांच्या टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. यातील हैदर रमजान तडवी (रा.मारुळ, ता.यावल) हा अजूनही फरार आहे.अशी आहे टोळीमेहमूद शहा याच्या टोळीत एलीयास दिन मोहम्मद चौधरी (वय ३६, रा.अक्सा नगर, जळगाव), अकबर निजामखॉँ तडवी (वय ३०), फिरोज रमजान तडवी (वय ३२),राजवीरसिंग उर्फ राजू प्रतापसिंह चौहान (वय २८) रा.न्हावी ता.यावल, शरीफ उर्फ गजरा नशीर तडवी (वय ३५ रा.वडगाव ता.रावेर), फिरोज किताब तडवी, संजय नथ्थू तडवी (वय ३० रा.गौरखेडा ता.रावेर) व हैदर रमजान तडवी (रा.मारुळ) आदी जणांचा समावेश आहे. यातील राजवीरसिंग हा बहादुरगंज ता.करेली बाजार जि.इलाहाबाद (उत्तर प्रदेश) चा रहिवाशी आहे तर फरार असल्याचे सहायक निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले. दरम्यान फरार झाल्यानंतर मेहमूद याने बोरगाव ते कामठी या रस्त्यावर केबल टाकण्याचे काम केले.मौल्यवान वस्तुंची चोरीरोहीत्र व त्यातील स्टॅँपींग लोखंडी प्या, रोहित्राची कोर, इन्शुलेन्स पेपरने कोटींग केलेली ॲल्युमिनियम वायर, इन्शुलेन्स पेपर, ॲल्युमिनियम कॉईल्स, त्याचे रॉड आदी साहित्य चोरी केले जात होते. त्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दोन जण रस्त्यावर थांबून बाकीचे स्पॉटवर रोहीत्र फोडण्याचे काम करायचे. माल ताब्यात घेतल्यानंतर जळगाव एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये साठा केला जात होता. तेथून भंगारवाला एलियास हा त्याची विक्री करायचा.या टोळीने फैजपूर, सावदा, रावेर, यावल भागात मोठ्या प्रमाणात चोर्या केल्याचे उघड झाले आहे.यांनी लावला सापळाया गुन्ात मेहमूद शहा याचे नाव उघड झाल्यानंतर तो फरार होता. सहायक निरीक्षक दीपक लगड यांच्या पथकातील भास्कर पाटील, शशिकांत पाटील, मिलिंद सोनवणे, संजय पाटील, मिनल साखळीकर, छाया मराठे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने मेहमूद शहा याच्या घरी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.