रोहितच्या आत्महत्येचा दलितांच्या अधिकाराशी संबंध नाही - भाजप
By admin | Published: January 19, 2016 06:10 PM2016-01-19T18:10:16+5:302016-01-19T18:25:34+5:30
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
याच काँग्रेसने आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला आणि आता आपण दलितांचे कैवारी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांतील काही गटांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा राजकारण चालवले आहे असा आरोप भाजपचे सरचिटणीस पी.मुरलीधर राव यांनी केला.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा दलितांच्या अधिकाराशी काहीही संबंध नाही. पण रोहित वेमुला दलिता होता म्हणून या विषयाचे फक्त राजकारण सुरु आहे असा आरोप मुरलीधर राव यांनी आपल्या टि्वटसमधून केला आहे. न्यायालयाच्या सल्ल्यावरुन रोहितवर शिस्तभंगाची कारवाई केली तसेच विद्यापीठाच्या अधिका-यांनी सौम्य भूमिका घेत त्याला विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करायला परवानगी दिली होती. राहुल गांधींनी घाईघाईने विद्यापीठाला भेट देणे हे योग्य नसल्याचे मुरलीधर राव यांनी म्हटले आहे.
Suicide of Rohith Vemula has nothing to do with Dalit issues or rights just because he was a Dalit. It is merely politicising of the issue.
— P Muralidhar Rao (@PMuralidharRao) January 19, 2016
Congress did gross injustice to Dr.B.R.Ambedkar & harassed him all his life. Now Sh.@OfficeOfRG & Sh.@digvijaya_28 championing Dalit cause!!
— P Muralidhar Rao (@PMuralidharRao) January 19, 2016
Sh.@OfficeOfRG 's hurried visit to Hyderabad is an unprincipled behaviour &unfortunate that a national political party stoop to such levels.
— P Muralidhar Rao (@PMuralidharRao) January 19, 2016
Sh.@ArvindKejriwal, like always,is trying to fish in troubled waters in the politicized issue of Rohit Vemula suicide! #StopIdentityPolitics
— P Muralidhar Rao (@PMuralidharRao) January 19, 2016