प्रेरणादायी! MBA पास तरुणाने नोकरी सोडली अन् शक्कल लढवली; 'अशी' करतोय लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:10 PM2021-11-10T12:10:40+5:302021-11-10T12:21:17+5:30
MBA pass youth quit his job and started business : नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे.
नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने स्टार्टअप अंतर्गत दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि महिन्याभरात लाखोंची कमाई केली आहे. प्रदीप श्योराण असं या व्य़क्तीचं नाव असून ते हरियाणाचा रहिवासी आहे. प्रदीप यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली आणि बागरी मिल्क पार्लर सुरू केले. पूर्वी हा फक्त एक छोटा स्टॉल होता आणि आज रोहतकमध्ये त्यांचे एक चांगले आऊटलेट आहे. सुरुवातीला दुधापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज विविध प्रकारच्या 20 उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे.
हरियाणातीलच नाही तर दिल्ली, पंजाब, राजस्थानमधूनही लोक प्रदीपच्या "बागडी मिल्क पार्लर"मध्ये येत असतात. या संदर्भात प्रदीप यांनी लहान-मोठ्या शहरातील सुशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील तरुण अशा प्रकारे स्वत:चे काम करून कुटुंबाला पुढे नेऊ शकतात. प्रदीप हे मूळचे हरियाणातील चरखी दादरी या जिल्ह्यातील मांढी पिरानू गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असून त्याचे वडील शाळेत नोकरी करायचे. प्रदीप यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली, पण त्यात यश न मिळाल्याने त्याने एमबीएला प्रवेश घेतला.
एमबीएची पदवीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण सुरुवातीला त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकली नाही. काही काळानंतर त्यांना व्हेल्स इलेक्ट्रिकमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि ते त्या कंपनीत 2018 पर्यंत होते. नोकरीत त्यांना अनेकवेळा प्रमोशनही मिळाले आणि पगारही चांगला होता. पण या कामातून त्यांना समाधान मिळत नव्हते. प्रदीप यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची काही बचत होती आणि कुटुंबातील काही सदस्यांचाही पाठिंबा मिळाला. 2018 मध्ये नोकरी सोडून त्यांनी सुमारे 24 राज्यांतील विविध शेतकरी, व्यावसायिकांना भेटी दिल्या.
प्रदीप यांना बिझनेस तर करायचाच होता पण असा काही बिझनेस करायचा होता ज्याला मार्केट मध्ये डिमांड आहे आणि जो चालणार आहे. प्रदीप यांनी त्यांच्या सर्व दौऱ्यांमधून त्यांना एकच गोष्ट समजली की शेतकरी तीन प्रकारचे व्यवसाय करू शकतात - पहिला तृणधान्ये, कडधान्ये इत्यादी, दुसरा दूध आणि तिसरा अंडी इ. त्यामुळे आम्ही दूध व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं. रोहतकमध्ये दोन मोठी उद्याने आहेत, जिथे सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते. या उद्यानांच्या बाहेर त्यांनी आपले ‘बागडी मिल्क पार्लर’ सुरू केले. त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरुवात केली तेव्हा थंडीच्या काळात ते मातीच्या कुल्हडमध्ये गरम दूध द्यायचे.